Video ! एनसीबीच्या कारवाईनंतर बेक्कार अवस्था झालीये आर्यन खानची; सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Video ! एनसीबीच्या कारवाईनंतर बेक्कार अवस्था झालीये आर्यन खानची; सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. मुंबईहून गोव्याला जाण्याऱ्या एका आलिशान क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यात आर्यनचाही समावेश आहे.

क्रूझवर अंमली पदार्थांचं सेवन केलं जात असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. परंतु, याप्रकरणी आर्यनचं नाव आल्याने सोशल मीडियावर वातावरण तापलं आहे. अशात आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतो आहे. आर्यनचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये प्रचंड वायरल झाला आहे.

व्हिडिओत आर्यन तोंडाला मास्क लावून गोंधळलेल्या अवस्थेत बसलेला दिसत आहे. त्यातही आर्यनच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता दोन्ही स्पष्ट दिसून येत आहेत. हा व्हिडीओ एनसीबीच्या चौकशी दरम्यानचा असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच आर्यनचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे.

फोटोत आर्यनसोबत एक एनसीबी अधिकारी असल्याचं म्हटलं जातंय. परंतु, हा व्हिडीओ आणि फोटो एनसीबीच्या कारवाईदरम्यानचा असल्याचं सिद्ध झालेलं नाही.एका एनसीबी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री या क्रूजवर एनसीबीने छापेमारी केली. आर्यनला रविवारी सकाळी पुढील चौकशीसाठी एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणण्यात आलं.

आर्यनला अटक करण्यात आलं नसल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं. परंतु, या प्रकरणी एनसीबीने तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. मात्र आर्यनची वैद्यकीय चाचणी केल्यानंतरच सत्य समोर येणार आहे. क्रूजवर अंमली पदार्थ कुठून आणले गेले याचीही चौकशी सुरू आहे.

Team Hou De Viral