या मराठमोळ्या अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली ? लवकरच लग्नबंधनात..

या मराठमोळ्या अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली ? लवकरच लग्नबंधनात..

गेल्या काही वर्षात छोट्या पडद्यावर नवीन मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहेत. यामध्ये आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं, मुलगी झाली हो, माझा होशील ना यासारख्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत.

मात्र, काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आणि त्या बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये आपल्याला स्वामिनी या मालिकेचे नाव आवर्जून घेता येईल. ही मालिका प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे बंद करण्यात आली आहे. माझा होशील ना या मालिकेमध्ये गौतमी देशपांडे देखील दिसलेली आहे. तिची भूमिका या मालिकेत चांगली झालेली आहे.

गौतमी ही मृण्मयी देशपांडे ची बहिण आहे. दोघी बहिणी देखील अभिनेत्री असून या दोघींकडे अनेक मालिका सध्या आहेत. त्याचबरोबर या मालिकेमध्ये मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी हादेखील दिसत आहे. विराज कुलकर्णी याने आजवर अनेक मालिकांत काम केलेले आहे. आता माझा होशील ना ही मालिका रंजक टप्प्यावर आलेली आहे.

माझा होशील ना या मालिकेमध्ये अनेक कलाकार हे आपल्याला दिसत आहेत. मात्र यामध्ये आशय कुलकर्णी याची भूमिका फारच लोकप्रिय झाली आहे, आश य कुलकर्णी याने अतिशय जबरदस्त रीत्या मालिकेमध्ये काम केले आहे. त्याच्या भूमिकेला अनेकांनी गौरवले देखील आहे, त्याची ही भूमिका अल्पावधीतच लोकप्रिय झाल्याचे आपण पाहिले आहे, आशय कुलकर्णी हा इतर मालिका देखील आपल्याला दिसलेला आहे.

त्याने अतिशय जबरदस्त काम केलेले आहे. आशय कुलकर्णी हा सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना तो वेगवेगळी माहिती देत असतो. आता आशय कुलकर्णी याच्या बाबतीतली एक बातमी नुकतीच समोर आली आहे. कारण की त्याने एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक तरुणी दिसत आहे. अनेकांना हा प्रश्न पडला की, ही तरुणी नेमकी कोण आहे, तर आशय कुलकर्णी याने हा फोटो पोस्ट करताना म्हटले आहे की, आपण हिला ओळखले का? मात्र अनेकांना तिला ओळखता आले नाही तर आशय कुलकर्णी याने नंतर सांगितले की, ही माझी गर्लफ्रेंड आहे.

आशय याचे सध्या सानिया गोडबोले या तरुणीसोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर आशय आणि सानिया हे लवकरच लग्न करणार असल्याचे देखील बोलले जाते.

Team Hou De Viral