‘अभिज्ञा भावे’ सोबत घडली वाईट घटना

तू तेव्हा तशी ही मालिका गेल्या काही दिवसापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र, मनोरंजन करत असतानाच या मालिकेतील कलाकारांबद्दल अपशब्द प्रेक्षक काढत आहेत. त्यामुळे ही मालिका एकदम चर्चेत आली आहे. तू तेव्हा तशी या मालिकेमध्ये आपल्याला स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची प्रमुख भूमिका दिसली आहे.
अनेक वर्षानंतर हे दोघेही एकत्र काम करताना आपण पाहत आहोत. याआधी शिल्पा तुळसकर आणि स्वप्निल जोशी यांनी दूरदर्शनवरील एका मालिकेमध्ये माय लेकाची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेते दारासिंग देखील होते. त्यावेळेस या मालिकेची चर्चा झाली होती. मात्र, असे असताना आता काही वर्षानंतर ही जोडी पती-पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे.
त्यामुळेच प्रेक्षकांनी या मालिकेवर यापूर्वीच टीका करून निर्माता दिग्दर्शकांना भंडावून सोडले होते, तर आता ही मालिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे या मालिकेत काम करणारी एक अभिनेत्री आहे. या मालिकेमध्ये आपल्याला वल्लीच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री अभिज्ञा भावे ही देखील दिसत आहे. अभिज्ञा भावे हिने याआधी अनेक मालिका चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
अभिज्ञा भावेचे वैयक्तिक आयुष्य देखील काहीसे चर्चेत राहिले आहे. याचे कारण म्हणजे तिचे दोन लग्न झाले आहेत. आता तिच्या दुसऱ्या प्रतीचे नाव मेहुल पै असे आहे. मेहूल पै याला काही दिवसापूर्वी कर्करोग झाला होता. आता तो या आजारातून बरा झाल्याचे सांगण्यात येत आहे. अभिज्ञा भावे हिचे पहिले लग्न वरूण वैतीकर याच्यासोबत झाले होते.मात्र हे लग्न काही कारणाने तुटले होते.
आता तू तेव्हा तशी या मालिकेमुळे अभिज्ञा चर्चेत आली आहे. अभिज्ञा भावे हिने या मालिकेमध्ये वल्ली ही नकारात्मक भूमिका साकारली आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी तिला ट्रोल केले आहे. अनेक प्रेक्षकांनी तिला म्हटले आहे की, तू चांगल्या भूमिका कधी करू शकत नाहीस का? तू कधीही वाईट भूमिकाच करतेस तू असे का करतेस? एवढी सुंदर दिसतेस तर चांगले काम देखील करत जा, असे म्हणून तिला अनेकांनी शिव्या घातल्या आहेत.
तर यावर अभिज्ञा भावे हिने उत्तर देताना सांगितले की, मला अशा भूमिका मिळतात त्याला मी तरी काय करू. माझी आजी देखील मला नेहमी म्हणते की, आमचे संस्कार असेच होते का? तू अशा भूमिका का करतेस? असे ती ओरडत असते. तर प्रेक्षकांच्या या मतावर आपले काय मत आहे.