या मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, पतीला झाला कॅन्सर

या मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, पतीला झाला कॅन्सर

मराठी कला विश्वामध्ये सध्या काही कलाकार हे लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत, तर मराठी चित्रपट मालिकांमधील काही कलाकारांना गेल्या काही वर्षांमध्ये गंभीर आजाराची लागण झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

काही वर्षांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे देखील कर्करोगासारख्या आजाराने ग्रासली होती. मात्र, सोनाली बेंद्रे हिने कर्करोगावर यशस्वीपणे मात केली होती आणि आपले वेळोवेळी फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. आता येथील मराठी चित्रपट सृष्टी मधील एक आघाडीच्या अभिनेत्रीच्या पतीला देखील कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासले आहे.

कुठलाही आजार म्हटले की, त्या बरोबरच पूर्ण कुटुंब हे निराश होत असते. त्याचप्रमाणे त्यांना देखील संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे कुठलाही आजार हा परवडत नसतो त्यामुळे माणसाने आपली प्रकृती ही चांगली ठेवून आपले आरोग्य जपले पाहिजे, असे डॉक्टर देखील सांगतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये खान पानातील बदल यामुळे अनेक जण हे आजारी पडल्याचे निदर्शनास येत आहे.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून हे प्रमाण तर लक्षणीयरीत्या वाढले आहे. कोरोना महामारी झाल्यानंतर हे प्रमाण अधिक प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. आता देखील मराठी चित्रपट सृष्टी मधील एक आघाडीची अभिनेत्री ही देखील सध्या संकटात आहे. तिच्या पतीला कर्करोगाने ग्रासले आहे. आपल्याला वाटत असेल की अभिनेत्री आहे तरी कोण.

या अभिनेत्रीचे नाव अभिज्ञा भावे असे आहे. अभिज्ञा भावे हिने अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे. अभिज्ञा भावे हिने आजवर अनेक मराठी मालिका हिंदी मालिका देखील काम केले आहे. हिंदी मालिकांमध्ये तिला विशेष अशी ओळख मिळाली आहे. अभिज्ञा भावे हिने पवित्र रिश्ता 2 या हिंदी मालिकेतील महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर प्यार की ये एक काहणी, बडे अच्छे लगते है यासारख्या हिंदी मालिका देखील तिने काम केले. मराठीमध्ये देखील तिने अनेक मालिकांत काम केले आहे. आता मराठीत अभिज्ञाने लगोरी देवयानी खुलता कळी खुलेना यासारख्या मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

कट्टी बट्टी, तुला पाहते रे, रंग माझा वेगळा यासारख्या मालिका तिला प्रेक्षकांनी वेगळ्या भूमिकेत पाहिले आहे. आता ती तू तेव्हा तशी या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आलेली आहे. या मालिकेतील तिची भूमिका देखील लोकप्रिय ठरली आहे.

अभिज्ञा भावे हिचे मेहुल पै याच्यासोबत लग्न झाले आहे. हे तिचे दुसरे लग्न आहे. पहिला तिचा घटस्फोट झालेला आहे. आता तिने पती सोबतचा काही दिवसांपूर्वी फोटो शेअर केला होता. मात्र आता मेहुल यानेच आपल्याला कॅन्सरसारख्या आजाराची लागण झाल्याचे सांगितले आणि एक फोटो देखील शेअर केला आहे.

सुरुवातीला माझा पती एक मोठ्या आजाराने ग्रासलेला आहे, असे तिने सांगितले होते. मात्र, आता या आजाराचे निदान झालेले आहे. हॉस्पिटल मधला एक फोटो शेअर केलेला आहे. यामध्ये त्याच्या हाताला सलाइन लावलेले दिसत आहे. 6 जानेवारी रोजी अभिज्ञा हिने हा फोटो शेअर केला होता. आता तिला धीर देण्यासाठी अनेक जण पुढे आले आहेत.

आता अभिज्ञा भावे ही तू तेव्हा तशी या मालिकेत दिसत आहे. या मालिकेतील स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर यांच्या भूमिका आहेत. अभिज्ञाच्या या मालिकेची प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागली आहे.

Team Hou De Viral