ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री करणार दुसऱ्यांदा लग्न, नाव ऐकून आश्चर्य वाटेल !

ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री करणार दुसऱ्यांदा लग्न, नाव ऐकून आश्चर्य वाटेल !

‘तुला पाहते रे’ आणि ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला असून याच फोटोमुळे ही चर्चा सुरू झाली आहे. अभिज्ञानं मेहूल पै सोबत फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने प्रेमाची कबुली दिली आहे.

‘नेहमीच कृतज्ञ राहीन’, असं कॅप्शन देत अभिज्ञाने #myforever असा हॅशटॅग दिला. गेल्या काही महिन्यांपासून अभिज्ञा व मेहूल एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता अभिज्ञाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्याला दुजोरा दिला आहे. या फोटोवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत.

२०१४ मध्ये अभिज्ञाचं वरुण वैटिकरसोबत लग्न झालं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अभिज्ञाला ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेने सर्वप्रथम ओळख मिळवून दिली. पहिल्याच मालिकेत तिनं नकारात्मक भूमिका साकारली होती.

त्यानंतर सुबोध भावे व गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘तुला पाहते रे’ मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. मालिकांसोबत तिने चित्रपट व वेब सीरिजमध्येही काम केलंय. मात्र अभिनयाकडे वळण्यापूर्वी ती एअर होस्टेस म्हणून काम करत होती. अभिज्ञा व तेजस्विनी पंडित यांचा ‘तेजाज्ञा’ हा फॅशन ब्रँडसुद्धा फार प्रसिद्ध आहे.

दरम्यान, विणकाम, रंगवलेल्या जुन्या प्लास्टिकच्या बाटल्या, जुन्या कपड्यांपासून तयार केलेल्या कलाकृती, चित्रं अशा विविध कलाकृती सध्या अभिज्ञा भावेच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर झळकत आहेत. पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरणारा वस्तूंचा पुनर्वापर यातून पाहायला मिळतोय.

स्वत:चा छंदही ती जोपासते आहे. आधीपासूनच या गोष्टींची आवड असलेली अभिज्ञा, आता हातात पुरेसा वेळ मिळाल्यानं विविध कलाकृती करतेय. प्लास्टिक बाटल्यांचा वापर करून त्यावर नक्षीकाम करून फुलदाणी बनवणं, जुन्या कपड्याचा वापर करत वॉल हँगिंग, बास्केट बनवणं अशा टाकाऊतून टिकाऊ कलाकृती ती साकारतेय.

अगदी उशांची कव्हर्स, चादरीवर विणकाम करून करून ती आकर्षक बनवते आहे. संपूर्ण घराची सजावट करताना जुनी, फिकट रंग झालेली दारं-खिडक्या, टेबल्स या प्रत्येक गोष्टीला काही ना काही कलात्मक रूप देण्याचे तिचे प्रयत्न सुरू असतात.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral