‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील अभिमन्यूची खऱ्या आयुष्यातील लतिका पाहिली का? दिसायला आहे खूपच सुंदर

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील अभिमन्यूची खऱ्या आयुष्यातील लतिका पाहिली का? दिसायला आहे खूपच सुंदर

‘सध्या सुंदरा मना मध्ये भरली’ ही मालिका अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेत अभिमन्यू म्हणजे आभ्या आणि लतिका यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. यातील इतर भूमिका देखील चांगल्या झाल्या आहेत. या मालिकेमध्ये नुकतीच एका अभिनेत्रीची एन्ट्री झालेली आहे. या अभिनेत्रीचे पात्र म्हणजे नंदिनी हे होय. याबाबतचा प्रोमो देखील नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या प्रोमोमध्ये ती पूर्णपणे दिसत नाही.

मात्र, ही अभिनेत्री कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. अनेक मालिकांमध्ये काहीतरी ट्विस्ट यायला सुरुवात झाल्यानंतर मध्येच एखाद्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याची एन्ट्री होते. त्यानंतर ही मालिका रंजक वळणावर जाऊन पोहोचते. आता “सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेमध्ये देखील नंदनी हे पात्र अभिनेत्री आदिती द्रविड हिने साकारले आहे. आदिती द्रविड ही या आधी देखील अनेक मालिकामध्ये दिसलेली आहे.

याआधी तिने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत काम केले होते. त्यामुळे आता “सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेमध्ये अभ्या आणि नंदिनी यांच्यामध्ये काही होते का? आणि अभिमन्यू हा लतीकला बाजूला सारतो का? हे देखील आपल्याला पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच “सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेमध्ये उमेश दामले यांनी देखील चांगले काम केलेले आहे. उमेश दामले म्हणजे या मालिकेमध्ये लतिका हिचे बापू.

याचप्रमाणे या मालिकेमध्ये दौलत हे पात्र देखील प्रेक्षकांना चांगलच आवडते. दौलत ही भूमिका ऋषिकेश शेलार याने साकारलेली आहे. मालिकेच्या एका भागामध्ये लतिका हिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येतो. त्यावेळेस दौलत हा तिचा सत्कार समारंभ उधळून लावतो. तसेच या सत्कार समारंभचा एक व्हिडिओ काही दिवसापूर्वी शेअर झाला होता. हा सीन मालिकेत दाखवण्यात आला नसला तरी खाजगीमध्ये हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

या व्हिडिओमध्ये अभ्या हा लतिका च्या गळ्यामध्ये हार घालतो आणि समोर बसलेल्या लोकांकडे हात दाखवतो, असा हा व्हिडिओ होता. याची चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे.अभिमन्यू ही भूमिका अभिनेता समीर परांजपे याने साकारलेली आहे. समीर परांजपे याने या आधी देखील अनेक मालिका व चित्रपटात देखील काम केले आहे. त्याने केलेल्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.

समीर परांजपे यांचे ज्याप्रमाणे मालिकेत लतिका हिच्यावर प्रेम आहे त्याच प्रमाणे खासगीत देखील त्याचे एका तरुणीसोबत प्रेम आहे. त्यानेकाही वर्षापूर्वी लव मॅरेज केले आहे. 27 नोव्हेंबर 2016 मध्ये समीर परांजपे याने अनुजा हिच्यासोबत लव मॅरेज केले आहे. अनुजा ही समीर याची कॉलेजमधील मैत्रीण होती. एकमेकांना अकरा वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी लगीनगाठ बांधलेली आहे.

तर आपल्याला सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमधील समीर परांजपे याची भूमिका आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral