‘अबोली’ फेम अंकुशची पत्नी देखील आहे दिग्गज कलाकार, बघा कोण आहे ती

‘अबोली’ फेम अंकुशची पत्नी देखील आहे दिग्गज कलाकार, बघा कोण आहे ती

स्टार प्रवाह वरील अबोली ही मालिका प्रेक्षकांना आवडत असून या मालिकेतील कलाकार देखील प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. मालिकेतील अंकुश म्हणजेच अभिनेता सचित पाटील हा प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. सचित पाटील याने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे.

आपल्या अभिनयाने त्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. काही वर्षांपूर्वी अवधूत गुप्ते यांचा झेंडा हा चित्रपट आला होता. झेंडा या चित्रपटात त्याने अतिशय जबरदस्त अशी भूमिका साकारली होती. झेंडा चित्रपटानंतर त्याला अनेक चित्रपटात काम मिळाले. सचित पाटील याचा जन्म 27 सप्टेंबर 1979 रोजी झाला आहे सध्या तो 42 वर्षांचा आहे.

सचित पाटील याने 2003 मध्ये क्यू या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट देखील प्रचंड गाजला होता. त्यानंतर त्याने सब कुछ है कुछ भी नही, या चित्रपटातही काम केले होते. त्यानंतर त्याने रास्ता-रोको या चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यानंतर त्याने साडे माडे तीन या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले होते.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला होता. मात्र, 2010 मध्ये आलेला झेंडा चित्रपटाने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली. क्षणभर विश्रांती या चित्रपटात त्याने सोनाली कुलकर्णीच्यासोबत काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बर्‍यापैकी चालला होता. त्यानंतर त्याने 2015 मध्ये आलेल्या क्लासमेंट या चित्रपटात काम केले.

या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले होते. तसेच त्याने असा मी तशी ती या चित्रपटात पल्लवी सुभाष सोबत देखील काम केले. कलर्स मराठी वर राधा प्रेम रंगी रंगीली हा शो देखील तसा गाजलेला आहे. काही वर्षांपूर्वी म्हणजेच 8 सप्टेंबर 2012 रोजी सचित याला गोवा पोलिसांनी अटक केली होती.

यावेळेस त्याच्यासोबत पाच महिला देखील होत्या. यानंतर त्याची खूप बदनामी झाली होती. सचित पाटील याचे शिक्षण मुंबईतील व रुपारेल कॉलेजमधून झाले आहे. त्याने त्याची वर्ग मैत्रीण शिल्पा पैच्या सोबतच लग्न केले आहे. शिल्पा ही देखील एक कलाकार असून तिने देखील आपल्या कलागुणांचा ठसा या क्षेत्रात उमटवला आहे.

सचित पाटीलची पत्नी एक लोकप्रिय गायिका आहे. सचित च्या बायकोच नाव शिल्पा असून तिने अनेक गाणी गायली आहेत. मराठी भाषेत आणि आहेतच शिवाय भोजपुरी भाषेत देखील गायनाचा ठसा उमटवला आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातील अनेक गाणी गायली असून या गाण्यांना रसिकांची पसंती मिळाली आहे.

तर तुम्हाला अबोली मालिकेतील अंकुश म्हणजेच अभिनेता सचित पाटीलची भूमिका आवडते का? आणि सचित शिल्पाची जोडी तुम्हाला कशी वाटते, आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा.

Team Hou De Viral