‘अबोली’ मालिकेत होणार ह्या ‘ढासू’ अभिनेत्रीची एन्ट्री

सर्वसामान्यप्रमाणेच कलाकारांना देखील आयुष्य असतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ते देखील आपल्यासारखेच असतं. फक्त त्यांचे राहणीमान हे थोडे वेगळे असते. आता मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्री बाबत देखील एक अशीच गोष्ट घडली होती.
या अभिनेत्रीला एका वर्षांपूर्वी मुलगी झाली होती. त्यानंतर ही अभिनेत्री मालिका विश्वातून गायब झाली होती, तर ही अभिनेत्री कुठली आहे, चला आपण जाणून घेऊया. काही वर्षांपूर्वी सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका छोट्या पडल्यावर सुरू झाली. महेश कोठारे निर्मित या मालिकेमध्ये अनेक कलाकार आपल्याला दिसलेले आहेत.
वर्षा उसगावकर जयदीपच्या भूमिकेमध्ये अभिनेता मंदार जाधव गिरिजा प्रभू वर्षा उसगावकर यासारखे कलाकार या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, या मालिकेमध्ये सगळ्यात जास्त भूमिका गाजली ती देवकी हिची. देवकी हिने ही मालिका सुरू असतानाच आपण गरोदर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिने गरोदर असताना देखील या मालिकेत काम केले होते.
त्यानंतर डिलिव्हरीसाठी तिनेही मालिका सोडली आणि तिने मग कमबॅक केलेच नाही. तिची जागी एक दुसरे पात्र मग मालिकेमध्ये घेण्यात आले. आता मीनाक्षी राठोडच्या बाबतीतलीच एक बातमी सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. याबाबतचे व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसत आहे. मीनाक्षी राठोड आता लवकरच एका मालिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे.
याबाबत तिनेच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मीनाक्षी राठोड हिच्या हातामध्ये एक स्क्रिप्ट दिसत आहे. ती स्क्रिप्ट वाचताना दिसत आहे आणि तिने कॅप्शन लिहिले आहे, “लो फील हम आ गये”, असे म्हटले आहे. मात्र आता मीनाक्षी राठोड ही नेमकी कुठल्या मालिकेत दिसणार आहे हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही.