मराठी कलाविश्वातील ‘या’ अभिनेत्यांच्या बहिणी देखील आहेत लोकप्रिय अभिनेत्री..

मराठी कलाविश्वातील ‘या’ अभिनेत्यांच्या बहिणी देखील आहेत लोकप्रिय अभिनेत्री..

मराठी मनोरंजन विश्वामध्ये अनेक असे कलाकार आहेत की, जे लोकप्रिय झालेले आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती देखील लोकप्रिय आहेत. मराठी चित्रपटसृष्टी मध्ये अनेक आशा बहिण भावाच्या जोड्या आहेत की, ज्या आज मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य करत आहेत. आज आम्ही आपल्याला अशाच काही बहिण भावाच्या जोड्यांबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

अभिषेक देशमुख – अभिषेक देशमुख सध्या आपल्याला आई कुठे काय करते या मालिकेमध्ये दिसत आहे. आई कुठे काय करते या मालिकेमध्ये तो यशच्या भूमिकेमध्ये सगळ्यांचे मनोरंजन करताना आपल्याला दिसत आहे. अभिषेक देशमुख याच्या बहिणीचे अमृता देशमुख असे असून अमृता देशमुख हे देखील अभिनेत्री आहे. सध्या ती बिग बॉस मध्ये सहभागी झाली आहे.

शशांक केतकर – शशांक केतकर याने होणार सुन मी या घरची या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात स्थान मिळवले. शशांक केतकर याच्याप्रमाणे त्याची बहीण देखील अभिनेत्री असून त्याच्या बहिणीचे नाव दीक्षा केतकर असे आहे. सोनी मराठी वरील तू सौभाग्यवती हो या मालिकेत ती आपल्याला दिसत आहे.

अभिनय बेर्डे – अभिनय बेर्डे हा दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आहे. त्याची बहिण स्वानंदी बेर्डे ही देखील अभिनेत्री आहे. या दोघांनीही अनेक चित्रपटात काम केले आहे. ही जोडी आता लोकप्रिय होताना दिसत आहे. अभिनय बेर्डे याने ती सध्या काय करते या चित्रपटात अतिशय जबरदस्त भूमिका साकारली होती.

गौतमी देशपांडे – मराठी चित्रपट सृष्टीत गौतमी देशपांडे हिने अल्पावधीतच आपले नाव कमावले आहे. गौतमी देशपांडेची बहीण मृण्मयी देशपांडे ही देखील अभिनेत्री आहे, तिने देखील अनेक मालिका आणि चित्रपटात एकत्रित काम केले आहे.

Team Hou De Viral