‘दे धक्का’मधली सायली बघा आता कशी दिसते, बघा तिचा ग्लॅमरस अंदाज

‘दे धक्का’मधली सायली बघा आता कशी दिसते, बघा  तिचा ग्लॅमरस अंदाज

2008 मध्ये आलेला चित्रपट ‘दे धक्का’ हा मराठी चित्रपटसृष्टीत सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडला होता आणि चित्रपटातील कलाकारांना तसेच त्यांच्या भूमिकांना रसिकांनी जणू डोक्यावर घेतले होते.

मकरंद अनासपुरे यांचा गावरान ठसका आणि सोबतीला सिद्धार्थ जाधवचा अतरंगी अंदाज हा रसिकांना खूपच भावला होता. आणि शिवाय शिवाजी साटम, मेधा मांजरेकर यांच्याही या चित्रपटात उत्तम भूमिका होत्या. आणि त्यांनी देखील त्या उत्कृष्ट पार पाडल्या होत्या.

‘दे धक्का’ या चित्रपटात दोन बालकलाकर होती आणि त्यांची त्यांच्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती. आणि तर बालकलाकार म्हणजे सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य. मात्र आता हे बालकलाकार काळानुसार मोठे झाले आहेत आणि त्यामुळे त्यांचा लूकही खूपच बदलला आहे.

गौरी वैद्य हिने दे धक्का या चित्रपटात सायली ही भूमिका साकारली होती. ‘दे धक्का’ चित्रपटाची कथा जिच्या डान्स स्पर्धेभोवती फिरत होती तीच महत्वाची भूमिका गौरीने साकारली होती. चित्रपटात तिच्यावर चित्रीत झालेलं उगवली शुक्राची चांदणी हे गाणे लोकांना खूपच आवडले होते आणि ते गाणं हिट ठरले होते. या चित्रपटातील याच गाण्यामुळे गौरीला ओळख आणि लोकप्रियता मिळाली.

गौरी आता 25 वर्षांची झाली आहे. तिने मुंबईत माटुंगा इथल्या ‘डी. जी. रुपारेल’ महाविद्यालयामधून शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी’मधून पदवी घेतली. आपलं शिक्षण पूर्ण करत असताना ती अभिनयापासून दूरावली. तिचा कोणताही नवा चित्रपट आलेला नाही.

‘दे धक्का’ चित्रपटानंतर गौरीने ‘शिक्षणाचा आयचो घो’ या चित्रपटातही सक्षमच्या बहिणीची भूमिका साकारली. २०११ मध्ये ‘एकापेक्षा एक जोडीचा मामला’ ह्या रियालिटी शोमध्ये तिने सक्षमसोबत सहभाग घेतला होता.

२०१५ साली तिने आवाहन चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २००७ साली आलेल्या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता. यांत तिने रूपा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.

तिच्यासोबत सचिन खेडेकर, मनोज जोशी, कश्मीरा शाह, अमृता खानविलकर, सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यामुळे आता पुन्हा गौरी चित्रपटात झळकणार का याची उत्सुकता आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral