रेखाच्या मांडीवर बसलेला हा क्युट मुलगा आहे कोण? 36 वर्षांपूर्वीचा PHOTO VIRAL

रेखाच्या मांडीवर बसलेला हा क्युट मुलगा आहे कोण? 36 वर्षांपूर्वीचा PHOTO VIRAL

अभिनेत्री रेखा आणि एका मुलाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. एक क्युट असा मुलगा रेखाच्या मांडीवर बसलेला दिसतो आहे. त्यामुळे हा मुलगा नेमका आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हा फोटो 36 वर्षे जुना आहे. 1984 साली रिलीज झालेली फिल्म झूठा सचच्या सेटवरील हा फोटो आहे. ज्यामध्ये रेखा आणि धर्मेंद्र यांच्यासह एक बिन्नी नावाचा एक बालकलाकार होता तो हाच. ‘झूठा सच’मधील बिन्नी म्हणजे दुसरा तिसरा कुणी नाही तर मोहब्बते फिल्ममधून सर्वांचं लक्ष वेधून घेणारा अभिनेता जुगल हंसराज आहे.

जुगलचा जन्म 26 जुलै 1972 रोजी मुंबईत झाला. 1983 मध्ये बालकलाकार म्हणून मासूम फिल्ममध्ये त्यानं काम केलं. अभिनेता म्हणून 1996 साली पापा कहते हैं फिल्ममध्ये तो दिसला. जुगलनं पापा कहते हैं, मोहब्बतें, हम प्यार तुम्ही से कर बैठे, सलाम नमस्ते, आजा नचले, रोडसाइड रोमियो, प्यार इम्पॉसिबल आणि कहानी 2 फिल्ममध्ये काम केलं.

मात्र 2000 साली मोहब्बते फिल्ममधून त्याला प्रसिद्धी मिळाली. या मल्टीस्टारर फिल्मनंतर त्याची कोणतीच फिल्म हिट ठरली नाही. जुगल आता 48 वर्षांचा झाला आहे. 2014 साली त्याने आपली NRI गर्लफ्रेंड जॅस्मीन ढिल्लनशी लग्न केलं. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत ऑकलंडमध्ये त्यानं आपला लग्नसोहळा आटोपला.

त्याच्या मित्रानं त्याच्या लग्नाची माहिती दिली होती. जुगलची पत्नी जॅस्मीन न्यूयॉर्कमध्ये इन्वेस्टमेंट बँकर आहे. जुगल आणि जॅस्मिनला सदक नावाचा एक मुलगाही आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral