‘फूल और कांटे’ या चित्रपटा दिसलेल्या सुंदर अभिनेत्रीची पहा काय हालत झालीये, ओळखणे देखील कठीण झालंय

‘फूल और कांटे’ या चित्रपटा दिसलेल्या सुंदर अभिनेत्रीची पहा काय हालत झालीये, ओळखणे देखील कठीण झालंय

आज अजय देवगनला बॉलिवूडच्या सुपरस्टार्समध्ये गणले जाते. अजय देवगनने चित्रपट जगतात एक विशेष स्थान मिळवले आहे. तो एक असा अभिनेता आहे जो विनोदी अभिनय किव्हा सिरीयस अभिनय प्रत्येक पात्रात अगदी योग्यरित्या फिट होऊन जातो. म्हणूनच तो सिनेमा जगातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता मानला जातो.

अजयने विनोदी, रोमांस आणि अ‍ॅक्शन तसेच गंभीर विषयांवर बनविलेल्या चित्रपटात जबरदस्त अभिनय केला आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. परंतु आज आपण अजय देवगण बद्दल नव्हे तर त्याच्यासोबत ‘फूल और कांटे’ मध्ये दिसलेली नायिका मधुबाला रघुनाथ बद्दल बोलणार आहोत, जिने या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता.

‘फूल और कांटे’ हा मधुबाला आणि अजयचा होता डेब्यु चित्रपट

22 नोव्हेंबर 1991 रोजी ‘फूल और कांटे’ या चित्रपटाद्वारे मधुबाला रघुनाथने अजय देवगणसोबत पदार्पण केले होते. अजय देवगन आणि मधुबालाचा हा डेब्यू फिल्म त्या काळातील सर्वात मोठा हिट चित्रपट होता. याच वेळी जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, सनी देओल यांचे बॉलिवूडमध्ये राज होते. पण, अजय देवगन आणि मधुबालाच्या या सुपरहिट डेब्यू चित्रपटाने या सर्व स्टार्सना मोठे आव्हान दिले होते.

मधुबालाचा अजय देवगनसोबतचा हा चित्रपट अ‍ॅक्शन आणि रोमान्सने परिपूर्ण होता. या चित्रपटाने जॅकी श्रॉफ, सनी देओल आणि सुनील शेट्टी या तिन्ही कलाकारांच्या कारकिर्दीवर लक्षणीय परिणाम केले. या एका चित्रपटामुळे या तिन्ही अभिनेत्यांनी बॉलिवूडमधील राजसत्ता गमावायला सुरुवात केली आणि अजय देवगण सोबत सलमान खान आणि आमिर खान बॉलिवूडचे उदयोन्मुख स्टार्स बनले.

मधुबाला रघुनाथने अजय देवगनच्या ‘फूल और कांटे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाच्या नंतर मधुबाला एका रात्रीतुन स्टार बनली. पण, त्यानंतर ती अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. फूल और काटे ची नायिका मधुबाला रघुनाथला बॉलिवूडमध्ये काम मिळणे कमी झाले. मात्र, त्यानंतर मधुबालाने बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये काम केले पण ती तितकी यशस्वी होऊ शकली नाही.

इच्छा नसतांना मधुबालाला बॉलिवूड सोडावे लागले.तथापि, मधुबालाने बऱ्याच चित्रपटांत काम केले. फूल और कांटे या चित्रपटाची नायिका मधुबाला रघुनाथचा 2011 मध्ये आलेला चित्रपट लव्ह यू कलाकार हा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटा नंतर फूल और कांटे ची नायिका मधुबाला रघुनाथ अद्याप कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.

अभिनय आणि सौंदर्यची खान असलेली ती आजकाल चित्रपटांपासून दूर आहे. मधूबालाने 1999 साली आनंदसोबत लग्न केले. या दिवसात ती आपल्या कुटुंबासह आनंदी आहे. तिला 2 मुले आहेत ज्यांची ती स्वतः काळजी घेते. अफाट कौशल्य असूनही मधुबालाला नशिबाने साथ न दिल्याने ती लवकरच बॉलिवूड पासून दूर झाली. तर फूल और कांटे हा देखील अजयचा पहिला चित्रपट होता आणि तो आज सुपरस्टार झालेला आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral