‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतून ही कलाकार घेणार निरोप, BMW सारख्या गाडींची आहे मालकीण

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतून ही कलाकार घेणार निरोप, BMW सारख्या गाडींची आहे मालकीण

सब टीव्हीवर प्रदर्शित होणारा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ याचे फॅन्स 3 महिन्याच्या काळानंतर कार्यक्रम सुरू झाल्यामुळे खूप खुश झाले आहेत. दरम्यान, शोच्या टीमने नुकतेच मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाची 12 वर्षे पूर्ण केली. पण या दरम्यानच्या काळात शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमीही आहे.

शोमध्ये अंजली तारक मेहताची भूमिका साकारणारी नेहा मेहता शो सोडून गेल्याचे वृत्त येत आहे. नेहा सुरुवातीपासूनच या शो सोबत जोडलेली आहे आणि पहिल्या भागापासून शोचा एक भाग राहिली आहे. पण आता अशी बातमी येत आहे की नेहाने पुन्हा या शोचे शूटिंग सुरू करण्यापूर्वी तिने शोच्या मेकर्सना सांगितले होते की ती हा शो सोडून जात आहे.

एन्टरटेनमेंट वेबसाइट स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, नेहा आतापर्यंत ऑन एअरमध्ये दिसणाऱ्या नव्या भागात दिसली नव्हती आणि लॉकडाउननंतर शूटिंग सुरू झाल्यापासून सेटवर दिसली नव्हती. नेहा हा या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तिचा शोमधून निघून जाणे प्रेक्षकांनसाठी मोठा धक्का आहे.

तथापि नेहा किंवा शोच्या मेकर्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. आता या वृत्तामध्ये किती सत्यता आहे त्यांच्या अधिकृत विधानानंतरच कळू शकेल. काही काळापूर्वी या कार्यक्रमात रोशनसिंग सोढीची भूमिका साकारणार्‍या गुरचरण सिंगनेही शो सोडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी या वृत्तांचा खंडन करत त्याला केवळ अफवा म्हणून संबोधले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार तारक मेहताची पत्नी अंजली भाभीची भूमिका करणारी नेहा या मालिकेसाठी एक दिवसाचे जवळपास पंचवीस हजार मानधन घेते. त्यासोबतच ती पंधरा दिवस शूटिंग करते.मीडिया रिपोर्ट्सनुसार तारक मेहताची पत्नी अंजली भाभीची भूमिका करणारी नेहा या मालिकेसाठी एक दिवसाचे जवळपास पंचवीस हजार मानधन घेते. त्यासोबतच ती पंधरा दिवस शूटिंग करते.

कार्यक्रमात दयाबेन उर्फ दिशा वकानी परत न आल्याने या कार्यक्रमाचे चाहते आधीच खूप निराश झाले आहेत, त्यामुळे या कार्यक्रमाचा आणखी एक लोकप्रिय सदस्य निरोप घेणार म्हणजे प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरू शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral