‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधल्या जुन्या सोनूचा बोल्ड अंदाज बघितला का ?

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधल्या जुन्या सोनूचा बोल्ड अंदाज बघितला का ?

तारक मेहता का उलटा चष्मा या प्रसिद्ध शो मधील जुनी सोनू म्हणजेच निधी भानुशाली तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. निधी काही दिवसांपूर्वी गोव्याच्या सुट्टीवर गेली होती. या सुट्यात निधीने निळ्या रंगाचे बिकिनी फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना निधीने व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी घेत आहे जेणेकरुन कोविड-१९ पासून दूर रहावे असे लिहिले होते.

निधीने तिच्या नवीन हेअरस्टाईलचा फोटोही शेअर केला आहे ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.निधीची बोल्ड स्टाईल पाहून चाहते खूप आश्चर्यचकित झाले आहे. पण, चाहते तिच्या या बोल्ड लुक चा आनंद घेत आहेत. प्रत्येकजण तिच्या या लूकचे कौतुक करत आहे. आत्माराम भिडे आणि माधवी भिडे यांच्या मुलीची भूमिका(सोनूची) भूमिका साकारणारी व्यक्तिरेखा निधी भानुशाली खऱ्या आयुष्यात बरीच धाडसी आहे.

तिच्या इंस्टाग्रामवर तिचे खूप जास्त फोटो आहेत. तिच्या स्टाईलिश फोटोतून तिची शैली पाहण्यासारखी आहे. तिने हा जो गोव्यातील फोटो शेअर केला आहे या फोटोत ती बीचवर मस्ती करताना दिसत आहे. काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये बीचवर उभ्या असलेल्या सोनूची हे फोटो खूप व्हायरल होत आहे

चाहते या फोटोवर बऱ्याच कमेंट करत आहेत आणि त्या फोटोचे जोरदार कौतुकही करत आहेत. तुमच्या माहितीसाठी की निधी च्या आधी सोनू ची व्यक्तिरेखा झील मेहता करत होती पण तिने ४ वर्षानंतर शो सोडल्यानंतर सोनूची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निधी भानुशाली शो मध्ये दाखल झाली.

निधीने अगदी थोड्या वेळात प्रेक्षकांचे प्रेम जिंकले आणि स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली. या शोमध्ये सहा वर्षांपासून आत्माराम भिडे आणि माधवी भिडे यांची मुलगी सोनू म्हणजेच सोनालिका भिडे यांच्या भूमिकेला बरीच फॅन फॉलोव्हिंग मिळाली होती.

२०१२ मध्ये निधीने झील मेहताची जागा सोनू म्हणून घेतली आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. निधीने या शोद्वारे टीव्हीमध्ये पदार्पण केले. निधी भानुशालीने सन 2019 मध्ये हा कार्यक्रम सोडला आणि तिची जागा पलक सिधवानी ने घेतली.

सोनूने तारक मेहता शो सोडल्याचे कारण तिला तिच्या उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित करावायचे होते. मीडिया रिपोर्टनुसार ती मुंबईतील महाविद्यालयातून बीए करत आहे. निधी वास्तविक जीवनात खूप स्टाईलिश आणि सुंदर आहे. निधी सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव आहे. शोमधून बाहेर पडल्यानंतर निधी भानुशाली सोशल मीडियावर प्रत्येक वेळेस अपडेट राहत असते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral