‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीशी होणार अभिनेता नितीनचे लग्न, पुढच्या महिण्यात होणार लग्न, पहा फोटो

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीशी होणार अभिनेता नितीनचे लग्न, पुढच्या महिण्यात होणार लग्न, पहा फोटो

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत नितीन आणि शालिनी हे कपल सर्वात जास्त चर्चिले जात आहे. जेव्हापासून या दोघांचा साखरपुडा झाला आहे तेव्हापासून नुसत्या बातम्याच बातम्या येत आहेत. दोघांची जोडी खूप चांगली आहे. दोघेही एकमेकांसोबत खूप खुश दिसत आहेत. त्यांच्याकडे पाहताना असे दिसते की जणू दोघेच एकमेकांसाठी बनलेले आहेत.

जेव्हापासून या दोघांचा साखरपुडा झाला आहे तेव्हापासूनच त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नितीन आणि शालिनी गेल्या एप्रिलमध्ये लग्न करणार होते, परंतु कोरोनाव्हायरस पसरल्यामुळे त्यांना लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली.

पुढच्या महिन्यात लग्न होणार

नितीन आणि शालिनी चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे, पुढच्या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये नितीन आणि शालिनी लग्न करणार आहेत. दोघांचे लग्न हैदाराबादमधील फार्म हाऊसमध्ये होणार आहे. या लग्नादरम्यान कोविड -19 शी संबंधित सर्व नियमांचे पालन व काळजी घेतली जाणार आहे.

या लग्नासाठी नातेवाईक आणि जवळचे आमंत्रण केलेले लोक यांना मास्क परिधान करणे, तसेच सॅनिटायझर्स वापरणे अनिवार्य असेल. सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून या लग्नात केवळ काही निवडक लोकांना आमंत्रित केले जाईल अशी माहिती आहे.

बऱ्याच दिवसांपासून ओळख पाळख

नितीन आणि शालिनी जवळपास 4 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत होते. शालिनी एमबीए पदवीधर आहे. तिने अमेरिकेत शिक्षण घेतलेले आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार नितीनही लग्नानंतर आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवण्यास उत्सुक आहे.

नितीनचा पुढचा चित्रपट

नितीन अखेरला भीष्म या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. नितीन लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर पीसी श्रीरामच्या पुढच्या चित्र रंग मध्ये दिसणार असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटात नितीनसमवेत अभिनेत्री कीर्ति सुरेशही दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral