ह्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या इमारतीला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी मारली उडी…?

ह्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या इमारतीला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी मारली उडी…?

हल्ली आगीच्या घटना या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि अशाच घटना आता सेलिब्रिटींच्या घरात देखील जाऊन पोहोचल्या असल्याचे दिसत आहे. आता अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. त्यानंतर एका अभिनेत्याने याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुंबईत राहणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या इमारतीला आग लागली आहे आणि ही आग लागल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हा अभिनेता ज्या इमारतीमध्ये राहत होता त्या इमारतीमध्ये ही आग लागली आणि त्यावेळेस एका मुलीने इमारतीवरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी उडी मारली. या अभिनेत्याने याबाबतचा व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

हा ठराविक प्रसंग सांगताना त्याचा देखील थरकाप झाला होता. हिंदी मालिकामध्ये लोकप्रिय असणारा अभिनेता राकेश पॉल याने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. इमारतीमध्ये राहत होता तेथून समोर असलेल्या एका इमारतीमध्ये भीषण आग लागली होती. या आगीमध्ये धुराचे लोट प्रचंड मोठ्या प्रमाणात हवेत उडताना दिसत आहेत. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र तोपर्यंत खूप मोठ्या घटना घडामोडी घडल्या होत्या. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेता राकेश पॉल याने म्हटले आहे की, मी सकाळी चित्रीकरण करण्यासाठी निघालो असतानाच मला अचानक समोरच्या इमारतीमधून मोठा धूर निघाल्याचे दिसले. त्यामुळे मी माझा मोबाईल काढला आणि हा व्हिडिओ शेअर केला. त्याने पुढे सांगितले की, मालाड मधील आमच्या 28 व्या मजल्यावर फायर आलाराम वाजला. त्यानंतर मोठी आग लागली.

सगळेजण खाली धावू लागले.मात्र ज्या फ्लॅटमध्ये आग लागली होती त्या फ्लॅटमध्ये राहणारी मुलगी ही अडकली होती. ती तिच्या खिडकीमध्ये उभी होती आणि मध्येच आगीचे मोठे लोट होते. सगळ्यांनी तिला काही वेळ थांबण्यासाठी सांगितले होते. मात्र ती खूपच घाबरली होती. त्यामुळे तिने वरून खाली उडी मारली होती. आता या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येते आणि तिची प्रकृती देखील गंभीर असल्याचे बोलले जात आहे.

पॉल जिथे राहतो तिथे सर्व काही सुरक्षा आहे. त्यामुळे सर्वांचे प्राण वाचवण्यात आले. मात्र त्या मुलीने उडी मारल्याने तिच्यावर आता उपचार सुरू असल्याचे देखील त्याने म्हटले आहे. एकूणच काय तर आगीची घटना कुठेही घडू शकते, असेही त्याने म्हटले आहे.

Team Hou De Viral