साऊथसृष्टी वर कोसळला दुःखाचा डोंगर ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची प्राणघातक हल्ला करून हत्या…

साऊथसृष्टी वर कोसळला दुःखाचा डोंगर ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची प्राणघातक हल्ला करून हत्या…

गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात अनेक दिग्गज कलाकार यांचे निधन झाल्याचे पाहायला मिळत आहे. अगदी काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा सुपरस्टार गायक केके याचे देखील आकस्मित निधन झाले.

एका लाईव्ह शो दरम्यान कोलकात्यामध्ये त्यांना मृत्यूने गवसणी घातली. गाणी गात असताना त्यांना हॉलमध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला होता आणि त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

तर बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसात अनेक कलाकारांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. चार बंगाली अभिनेत्री यांनी गेल्या काही दिवसात आपले जीवन संपवले आहे. तर अगदी काही महिन्यापूर्वी गानकोकिळा लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यानंतर रमेश देव, बप्पी लहरी यासारखे कलाकार देखील आपल्याला सोडून गेलेले आहेत.

यामध्ये आता आणखीन एका प्रसिद्ध अभिनेत्याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेता सतीश वज्र यांची हत्या करण्यात आली आहे. सतीश वज्र यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला आहे. काही अज्ञात व्यक्तींनी सतीश यांची हत्या केल्याचे सांगितले जात आहे. सतीश वज्र यांच्या हत्येनंतर कन्नड चित्रपटसृष्टी हादरली.

ही सतीश यांच्या मेव्हण्याने त्यांचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सतीश आर आर नगर मध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होते. रविवारी सतीश कामावरून परत आले असताना दोन अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी धारदार शस्त्राच्या मदतीने त्यांची हत्या करण्यात आली.

यानंतर मारेकरी तिथून पसार झाले. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या नोकरांनी सतीश यांच्यावर रूम मधून रक्त येत असल्याचे पाहिले. यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली. पोलिसांनी सतीश यांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पाठवले.

सतीश यांच्या हत्येच्या बातमीनंतर चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. त्यांचे अनेक चहाते या प्रकरणी हळहळ व्यक्त करत आहेत. सतीश यांनी कुटुंबाच्या विरोधात लग्न केलं होतं. या लग्नामुळे त्यांच्या पत्नीचे कुटुंबीय देखील आनंदी नव्हते. यावरून दोन्ही कुटुंबामध्ये वादाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कारणामुळे तीन महिन्यापूर्वीच त्यांच्या पत्नीनेही आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांची देखील हत्या करण्यात आली आहे. एकंदरीत अभिनेते सतीश यांचे दुःखद निधन झाले आहे.

Team Hou De Viral