निधनाच्या वेळी प्रेग्नेंट होती अमिताभ बच्चनची ही अभिनेत्री, इतक्या वाईटरित्या झाले होते निधन

21 मे 1999 रोजी रिलीज झालेल्या ‘सूर्यवंशम’ चित्रपटावर आजही लोक तितकेच प्रेम करत आहेत. आजही हा चित्रपट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात पाहायला जातो. या चित्रपटात अभिनेत्री सौंदर्या हिने अमिताभ बच्चनसोबतही काम केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी सौंदर्या त्यातून खूप लोकप्रिय झाली होती. सौंदर्या यांचा जन्म 18 जुलै 1972 रोजी झाला होता. ती दक्षिणच्या अनेक हिट चित्रपटांतही दिसलेली आहे.
वैद्यकीय शिक्षण सोडल्यानंतर चित्रपटात पाय ठेवला
‘सूर्यवंशम’ हा सौंदर्याचा पहिला आणि शेवटचा हिंदी चित्रपट होता. 1992 च्या कन्नड चित्रपटात ती पहिल्यांदा गंधर्व चित्रपटात दिसली आणि 12 वर्षाच्या कारकीर्दीत एकूण 14 चित्रपट तिने केले होते. सौंदर्या ही उद्योजक आणि चित्रपट लेखक-के.एस. सत्यनारायण यांची मुलगी होती आणि जेव्हा सौंदर्या एमबीबीएस करत होती, तेव्हा तिच्या वडिलांच्या मित्राने तिला या चित्रपटाची ऑफर दिली होती. यानंतर तिने आपले शिक्षण सोडले आणि ती अभिनेत्री बनली.
राजकारणात एन्ट्री –
त्यांनी हिंदी, तमिळ, तेलगू अशा अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी बहुतेक तमिळ चित्रपट केले. 2003 मध्ये त्यांनी आपला वर्गमित्र आणि सॉफ्टवेअर अभियंता जी.एस. रघुशी लग्न केले. चित्रपटांमधून प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्यांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
अगदी कमी वयात जगाला निरोप दिला –
17 एप्रिल 2004 रोजी सौंदर्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी करीमनगरला जात होती. पण हेलिकॉप्टर 100 फूट उंचीवर पोहोचताच क्रॅश झाले. या अपघातात सौंदर्या, तिचा भाऊ आणि इतर दोन लोक ठा.र झाले. हे अत्यंत वेदनादायक होते कारण ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा ती 7 महिन्याची गरोदर होती.
सौंदर्याने अवघ्या 31 व्या वर्षीच जगाला निरोप दिला होता. या घटनेने तिचे कुटुंब तसेच चाहते देखील खूप दुःखी झाले होते. आज त्यांना जाऊन जवळपास 16 वर्षे झाली आहेत, परंतु तो आपल्या चित्रपटांद्वारे चाहत्यांच्या हृदयात आजही त्या जिवंत आहेत.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.