‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटातील ती अभिनेत्री जिला समजायचे छोटी-मोठी अभिनेत्री, ती निघाली प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी

आजकालच्या जमान्यामध्ये मल्टीस्टारर चित्रपट काढण्याचा ट्रेंड निर्माण झालेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये असे चित्रपट काढण्यास सर्वांचा विरोध होता. मात्र, आता हा ट्रेंड बदलत चालला आहे. विशेष करून रोहित शेट्टी यांच्या चित्रपटात हा ट्रेंड बदलला गेल्याचे पाहायला मिळाले आहे. रोहित शेट्टी यांची गोलमाल सिरीज ही प्रचंड गाजली होती.
त्यांनी गोलमालचे बरेच पार्ट काढले आहेत आणि या पार्टमध्ये अनुक्रमे अजय देवगन, अर्शद वारसी श्रेयस तळपदे, तुषार कपूर यांच्या भूमिका आहेत. त्यानंतर बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांनी असे मल्टीस्टार चित्रपट करण्यास होकार दिला आहे. एक जमाना असा होता की, मल्टीस्टारर चित्रपट करण्यास दिग्गज अभिनेते तयार व्हायचे नाही.
मात्र, आता बदलत्या काळानुसार हे सर्व काही घडत आहे आणि मोठे मोठे अभिनेते देखील मल्टिस्टारर चित्रपटात काम करण्यास तयार होत आहेत. आम्ही आपल्याला आज एका चित्रपटाबद्दल माहिती देणार आहोत. शशांक घोष यांचा वीरे दी वेडिंग हा चित्रपट प्रचंड चालला होता. या चित्रपटांमध्ये चार अभिनेत्री होत्या. चार मुलींभोवती फिरणारी चित्रपटाची कथा होती.
या चित्रपटामध्ये सोनम कपूर, करीना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तासलानिया यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने सुरुवातीला दहा कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर या चित्रपटाने तीस कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. सोनम कपूर, करीना कपूर आणि स्वरा भास्कर यांची बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने ओळख तर आहेच.
मात्र, शीखा हिला बॉलीवूडमध्ये जास्त ओळख नाही. मात्र, तिने आपली ओळख निर्माण केली आहे. शिखा ही प्रसिद्ध अभिनेते व कॉमेडियन टिकू तलसानिया यांची मुलगी आहे. टिकू यांनी आजवर राजा हिंदुस्तानी, हीरो नंबर वन, देवदास, हंगामा, धमाल, जुडवा, दिल का रिश्ता, तकदीरवाला, कुली नंबर वन या सारख्या चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या चित्रपटातील भूमिका या प्रचंड गाजल्या आहेत.
छोटा रोल त्यांचा असायचा. मात्र, सर्वांना जास्त टिकू भाव खाऊन जायचे. टिकू यांची मुलगी देखील ही अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे आणि ती बॉलिवूडमध्ये आता करिअर करण्यासाठी तयार झालेली आहे. शिखा हिने आजवर बॉलिवुडमध्ये मिडनाइट चिल्ड्रन, माय फ्रेंड पिंटो, वेक अप सिड, दिल तो बच्चा है जी, प्लीज, प्रोजेक्ट आणि वेब सिरीज खाने मे क्या है, या मध्ये काम केलेले आहे.
तिच्या अभिनयाच सर्वत्र कौतुक होत आहे. आता ती येणाऱ्या काळामध्ये आणखी काही चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. सध्या तिच्याकडे काही काम नसल तरी आगामी चित्रपटात आपण नक्की काम करू, असे तिने सांगितले आहे.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.