अभिनेत्री ‘तेजश्री प्रधान’ ने दिली मोठी आनंदाची बातमी

अभिनेत्री ‘तेजश्री प्रधान’ ने दिली मोठी आनंदाची बातमी

मराठी मालिका मधील एक अभिनेत्री सध्या प्रचंड गाजत आहे. या अभिनेत्रीचे नाव तेजश्री प्रधान आहे. तेजश्री प्रधान काही वर्षांपूर्वी झी मराठीवर आलेल्या ‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. या मालिकेमध्ये तिने जान्हवीची भूमिका साकारली होती.

तिचे हे पात्र एवढे गाजले होते की, तिला त्यानंतर अनेक मालिका व चित्रपटाच्या ऑफर देखील मिळालेल्या आहेत. या मालिकेच्या आधी तेजश्री प्रधान हिने झेंडा या चित्रपटात देखील काम केले होते. या चित्रपटात तिने संतोष जुवेकरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. याआधी तेजश्री प्रधान हिने मॉडलिंग देखील केले आहे.

तसेच काही जाहिरातींमध्ये काम देखील केलेले आहे. काही नाटकात देखील तिने काम केले आहे. होणार सुन मी या घरची या मालिकेमध्ये शशांक केतकर याने श्रीची भूमिका साकारली होती. ही भूमिका देखील त्या वेळेस प्रचंड गाजली होती. मालिकेतील ही जोडी सर्व प्रेक्षकांना देखील खूप आवडली होती.

सहाजिकच या दोघांचे प्रेमसंबंध या मालिकेमुळे जुळले आणि त्यानंतर त्यांनी काही दिवसातच लग्न देखील केले. मात्र, काही महिन्यातच या दोघांचा घटस्फोट देखील झाला. पुण्यातील दिवाणी न्यायालयात त्यांचा घटस्फोट पूर्ण करण्यात आला, असे सांगण्यात येते. त्यानंतर शशांक केतकर याने दुसरे लग्न देखील केले. मात्र, तेजश्री प्रधान अजूनही एकटीच आहे.

झी मराठीवर तिची अग बाई सासुबाई ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेमध्ये तिने शुभ्राचे पात्र साकारले होते. तिचे हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते. या मालिकेत गिरीश ओक यांची भूमिका होती. तसेच निवेदिता सराफ यांनी देखील छान भूमिका साकारलेली होती.

आता तेजश्री प्रधान पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तेजस्वी प्रधान आणि वैभव तत्ववादी पुन्हा एकदा एका चित्रपटात एकत्र दिसणार आहे. या आधी देखील वैभव तत्ववादी आणि तेजश्री हे झी युवा या वाहिनीवरील एका मालिकेत एकत्र दिसले होते. त्याचबरोबर एक जाहिरात देखील त्यांनी एकत्रित केली होती.

आता या दोघांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोघांचा सोल्मेट हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वैभव कुंटे यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा मात्र अद्याप कळू शकली नाही. मात्र, हा चित्रपट हा यशस्वी होईल, असे तेजश्री हिने बोलताना सांगितले.

Team Hou De Viral