गायक आदर्श शिंदेची पत्नीही आहे गायिका, जाणून घ्या त्यांच्याविषयी खास माहिती

गायक आदर्श शिंदेची पत्नीही आहे गायिका, जाणून घ्या त्यांच्याविषयी खास माहिती

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अशी काही घराणी आहेत की, ज्यांनी चित्रपटसृष्टीची मनोभावे सेवा केली आहे. यामध्ये शिंदे कुटुंबीयांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. प्रल्हाद शिंदे यांनी जुन्या काळामध्ये अनेक चांगले धार्मिक गाणे मराठी चित्रपटसृष्टीला दिले. त्यांनी गायलेले गाणे प्रचंड गाजलेली आहेत.

“चल ग सखे चल ग सखे पंढरीला” हे त्यांचे गाणे अप्रतिम असे गाजले होते. याचबरोबर त्यांनी इतर धार्मिक गीते देखील गायली. याचबरोबर त्यांचा मुलगा आनंद शिंदे हे देखील प्रख्यात गायक आहेत. त्यांनी देखील आजवर अनेक हिट चित्रपटात गाणे गायले आहेत. त्यांनी गायलेली “कोंबडी पळाली” हे गाणे तर प्रचंड लोकप्रिय ठरले.

त्यानंतर या गाण्यावरून हिंदीत देखील “चिकणी चमेली” हे गाणे बनवण्यात आले होते. या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिले होते. आनंद शिंदे यांनी आजवर अनेक स्टेज शो तसेच चित्रपटातली गाणी गायलेले आहेत. आता आनंद शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा आदर्श शिंदे हा देखील अतिशय उत्कृष्ट असा गायक आहे.

त्याचप्रमाणे उत्कर्ष शिंदे हा त्याचा भाऊ देखील चांगल्या प्रकारे गाणे म्हणत असतो. उत्कर्ष शिंदे सध्या बिग बॉसच्या घरामधील सहभागी झाला आहे. उत्कर्ष शिंदे याने डॉक्टरची पदवी मिळवली आहे. आदर्श शिंदे याने देखील अनेक चित्रपटात गाणी गायलेली आहेत. तो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असतो.

त्याने गायलेले सुरूवातीचे गाणे प्रचंड गाजले होते. त्याने गायलेले “देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही” हे गीत अतिशय लोकप्रिय असे ठरले होते. वयाच्या बाराव्या वर्षी पासूनच त्याला गाण्याची आवड लागली. त्यानंतर त्याने अनेक स्टेज शो केले. आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तोदेखील मराठीतील आघाडीचा गायक बनला आहे.

आदर्श शिंदे याने “तुझ्या रूपाला” हे गाणे गायले होते. हे गाणे प्रचंड गाजले होते. आदर्श शिंदे यांनी 2015 मध्ये लव मॅरेज केले आहे. त्याच्या पत्नीचे नाव नेहा लेले असे आहे. दोघे देखील सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करत असतात. या दोघांचे थाटामाटात लग्न झाले होते. कुटुंबियांनी देखील यांच्या लग्नाला संमती दिली होती.

या दोघांच्या लग्नाला अभिनेता स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, रवी जाधव यासारखे मराठीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते. या दोघांचे फोटो पाहून दोघंही एकमेकांसाठी “मेड फॉर इच अदर” असल्या सारखेच दिसतात.

दोघांची जोडी अतिशय परफेक्ट असे आहे या दोघांनी नुकताच एक सोशल मीडियावर फोटो टाकला आहे दोन्ही त्यामध्ये अतिशय सुंदर दिसत आहे त्या दोघांना एक मुलगी आहे. तिचे नाव अंतरा शिंदे असे आहे, तर आपल्याला आदर्श शिंदे आवडतो का ते आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral