‘बिगबॉस…रुल्स वैगेरे गेले उडत’, वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या आदिशचा जय सोबत तुफान राडा, बघा काय कारण आहे

‘बिगबॉस…रुल्स वैगेरे गेले उडत’, वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या आदिशचा जय सोबत तुफान राडा, बघा काय कारण आहे

‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये रविवारी पार पडलेल्या बिग बॉसची चावडीमध्ये अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी अनेकांची शाळा घेतली. तसचं या भागात तिसऱ्या पर्वाचं पहिलं एलिमिनेशन पार पडलं. अभिनेता अक्षय वाघमारे घराबाहेर पडला. तर याच भागात या पर्वातील पहिली वाइल्ट कार्ड एण्ट्री झाली आहे.

अभिनेता आदिश वैद्यने घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली आहे. घरात एण्ट्री घेत असताना आदिशना काही पावर मिळणार आहेत. या पावरच्या मदतीने तो घरातील तीन सदस्यांना रात्रीचे पहारेकरी बनवू शकतो. तसचं घरातील सदस्यांना कामं वाटण्याचा अधिकार देखील त्याला मिळणार आहे.

आदिशच्या एण्ट्रीने घरातील सर्व सदस्यांना आर्श्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान ‘बिग बॉस मराठी ३’च्या येत्या भागात आदिशची घरात एण्ट्री होताच जय आणि आदिशमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच नवा प्रोमो शेअर करण्यात आलाय.

यात जय आणि आदिशमध्ये जुपल्याचं पाहायला मिळतंय. “फालतू अॅडिट्यूड मला दाखवायचा नाही… बॉडी बिडी काय असेल ते दुसऱ्यांसमोर दाखव” असं म्हणत आदिशने जयसोबत पंगा घेतलाय. तर जय देखील चांगलाच संतापल्याचं दिसतंय. जय आणि आदिशमध्ये सुरुवातीलाच वादाची ठिकणी पेटली आहे.

तर दुसरीकडे आदिश आणि स्नेहामध्ये देखील शाब्दिक चकमक उडताना दिसणार आहे. “आल्या आल्या त्रास दिला तुम्ही सगळ्यांना. जसं की आमचे तीन लोकं जखमी केले.” अशं स्नेहा आदिशला म्हणाली आहे.आदिशच्या वाइल्ड कार्ड एण्ट्रीमुळे आता स्पर्कांमध्ये कशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळतं.

कोण आदिशला आपल्या ग्रुपमध्ये घेणार आणि कोण त्याच्या पंगा घेणार? हे पाहणं आता उत्सुकतेचं असणार आहे.

Team Hou De Viral