‘आज तुमचे हे चांगले खेळले’, ऋतुराजचा खेळ पाहून चाहत्यांनी ‘या’ मराठी अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा

‘आज तुमचे हे चांगले खेळले’, ऋतुराजचा खेळ पाहून चाहत्यांनी ‘या’ मराठी अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा

चेन्नई सुपर किंग्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 4 विकेट्सनं पराभव करत आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऋतुराज गायकवाड व रॉबीन उथप्पा यांनी शतकीभागीदारी करून चेन्नई सुपर किंग्सला विजयाचं स्वप्नं दाखवलं. एकट्या ऋतुराजनं 70 धावा काढल्या. साहजिकच चेन्नई सुपर किंग्सच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा राहिला.

ऋतुराजचा हा फॉर्म पाहून चाहते सुखावले नसतील नवल. चाहते इतके खुश्श झालेत की, मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्या एका पोस्टवरही कमेंट करतानाही नेटक-यांना ऋतुराज आणि फक्त ऋतुराज आठवला. होय, ‘आज तुमचे हे चांगले खेळले’ अशा काय काय कमेंट्स सायलीच्या पोस्टवर पडल्या.

गेल्या काही दिवसांपासून सायली संजीव व ऋतुराजच्या अफेअरची चर्चा सुरू आहे. मध्यंतरी सायलीच्या एका फोटोवर ऋतुराजने ‘व्वा’ अशी कमेंट केली होती. त्याच्या या कमेंटला सायलीने देखील रिप्लाय दिला होता. तिने त्यावर हार्ट इमोजी सेंड केले होते. सायलीचा हा रिप्लाय पाहून दोघांमध्ये मैत्रीपलीकडचे नाते असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

हाच धागा पकडून कालची ऋतुराजची खेळी पाहून युजर्सनी सायलीला शुभेच्छा द्यायला सुरूवात केली. सायलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तिने तिच्या न्यू इयररिंग्स चाहत्यांना दाखवल्या. पण चाहत्यांना सायलीला पाहून फक्त ऋतुराज आठवला.

मग काय, सायलीच्या कमेंटबॉक्समध्ये चाहत्यांनी ऋतुराजच्या खेळीवरून एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्यात. ‘आज तुमचे हे चांगले खेळले’, असं एका चाहत्याने म्हटलं. ‘ऋतुराज नाम तो सुना ही होगा,’ अशी कमेंट एका चाहत्याने केली.‘सायली दीदीला ऋतुराज आवडत असेल खूप ऋतुराज.

चांगला खेळला भावा तू …आणि एकदा सायली ला भेटून घे मन शांत होईल सायली दीदीचं…, अशी मजेशीर कमेंट अन्य एका चाहत्याने केली. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीवने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.

सायली संजीव सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते.

Team Hou De Viral