मराठमोळे अभिनेते ‘अरुण नलावडें’च्या पत्नीला पाहिलंत का ?, आहेत प्रसिद्ध…

आपल्या चतुरुस्त अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अतिशय जबरदस्त अभिनय करणारे अभिनेते म्हणजे अरुण नलावडे. अरुण नलावडे यांनी अनेक मराठी मालिका चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अरुण नलावडे यांनी जुन्या काळामध्ये अनेक मालिका चित्रपटात काम केले.
काही वर्षांपूर्वी श्वास हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये त्यांनी अतिशय जबरदस्त अशी भूमिका केली होती. नातू आणि आजोबा यांच्यातील नाते सांगणारा हा श्वास चित्रपट रजत कमळ मिळवणारा चित्रपट देखील ठरला होता. त्याचप्रमाणे हा चित्रपट ऑस्करमध्ये देखील नॉमिनेट झाला होता. अरुण नलावडे यांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटांमध्ये चार चाँद लावले होते.
त्याचप्रमाणे अरुण नलावडे यांनी अनेक मालिकादेखील काम केले. काही महिन्यांपूर्वी आलेल्या मन उडू उडू झालं मालिकेमध्ये देखील त्यांनी देशपांडे सरांची भूमिका अतिशय चोखपणे पार पाडली. त्यांची ही भूमिका अतिशय लोकप्रिय अशी ठरली होती. अरुण नलावडे हे अनेक नाटकांमध्ये देखील दिसलेले आहेत आणि नाटकमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवून सोडले आहे.
काही चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका देखील साकारली आहे. मात्र खलनायका या भूमिका त्यांना यश मिळाले नाही. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये देखील त्यांनी अतिशय चांगले काम केले होते. राधिकाच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये ते दिसले होते. त्यांची या मालिकेतील भूमिका देखील लोकप्रिय ठरली होती. अरुण नलावडे हे सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांना वेगवेगळे मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर आपले फोटो देखील शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोला अनेक जण लाईक देखील करत असतात. कौटुंबिक स्तरावर देखील अरुण नलावडे हे खूप लोकप्रिय आहेत. त्यांना समाजकार्याची आवड देखील खूप आहे. अनेकदा समज कार्यामध्ये ती सहभाग घेताना दिसत असतात.
कोरोना काळामध्ये देखील अरुण नलावडे यांनी गरजूंना मदत केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. अरुण नलावडे यांच्या कुटुंबाबाबत बोलायचे झाले तर त्यांच्या पत्नी देखील या प्रसिद्ध चित्रकार आहेत. अरुण नलावडे यांच्या पत्नीचे नाव अंजली नलावडे असे आहे. त्यांनी अनेक चित्रे काढून वाहवा मिळवली आहे. अनेकदा त्यांच्या चित्राचे प्रदर्शन देखील लागलेले आहे.
अरुण नलावडे आणि त्यांच्या पत्नीमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीची नाते आहे, हे दोघेही सोशल मीडियावर आपले फोटो अनेकदा शेअर करताना देखील दिसत असतात, तर आपल्याला अरुण नलावडे हे आवडतात का आम्हाला नक्की सांगा.