‘अगंबाई अरेच्चा’ चित्रपटातील संजय नार्वेकरच्या बायकोला पाहिलंत का, आता दिसतेय लई ग्लॅमरस

साधारणत 2000 च्या सुमारास “अगंबाई अरेच्या” हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील संजय नार्वेकर याने साकारलेला श्रीराम देशमुख ही भूमिका सगळ्यांच्या लक्षात आजही आहे. ही भूमिका त्याची प्रचंड गाजली होती. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत त्याची बायको दिसली होती. आज आम्ही तिच्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहोत.
या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर यांनी देखील काम केले होते. दिलीप प्रभावळकर यांनी संजय नार्वेकर यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. एक अबोल व्यक्ती अशी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली होती. मुलगा करत असलेले कष्ट त्यांना सगळे दिसत असूनही ते काही करू शकत नाही. असे पात्र त्यांच्या वाट्याला आले होते.
या चित्रपटामध्ये सोनाली बेंद्रे हिने एक ॲटम सॉंग केले होते. हे ॲटम सॉंग प्रचंड गाजले. आजही या आयटम साँग ला प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यानंतर सोनाली बेंद्रे हिने मराठी चित्रपटात काम केले दिसत नाही. अग बाई अरेच्या या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर यांनी श्रीराम देशमुख ही भूमिका साकारली होती.
संजय नार्वेकर एकदा देवीच्या मंदिरात जातात आणि देवीसमोर म्हणतात की या बायकांच्या मनात काय चालले आहे, मला कधीच काही कळत नाही. देवी मला अशी शक्ती दे की, मी बायकांच्या मनातील ऐकू शकेल. त्यानंतर देवी त्याला खरंच वरदान देते. त्यानंतर संजय नार्वेकर याला बायकांच्या मनातील ऐकू येते. मात्र, या आशीर्वादामुळे तो चांगलाच वैतागतो.
यामुळे त्याला खूप ताप होत असतो. रस्त्याने येता जाताना बायकांच्या मनातील सगळे काही ऐकू येते. त्यामुळे ते त्रस्त होतो. या आशीर्वादामुळे त्याच्या आयुष्यामध्ये काही चांगले प्रसंग देखील घडतात. काही दहशतवादी बॉम्ब स्फोट करणार असतात आणि यामध्ये एक महिला दाखवण्यात आलेली आहे. ही महिला म्हणजे तेजस्विनी पंडित होती.
तेजस्विनी पंडित हीने दहशतवाद्याची भूमिका केली होती. तिच्या मनात काय चाललं आहे, ते संजय नार्वेकर याला ऐकू येते आणि एक मोठी दुर्घटना होण्यापासून तो खूप जणांना वाचवतो. त्याला यासाठी गौरवण्यात येते. या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर याच्या पत्नीची भूमिका प्रियंका यादव हिने साकारली होती.
प्रियंका यादव अतिशय सोज्वळ, गुणी अभिनेत्री असे यामध्ये दाखवण्यात आले होते. अलीकडेच प्रियंका यादव हिचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्या फोटोमध्ये प्रियंका ही अतिशय बोल्ड आणि ब्युटीफुल अशी दिसत आहे. अगं बाई अरेच्या या चित्रपटामध्ये अतिशय सोज्वळ भूमिका साकारणारी प्रियंका ही खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड अशी आहे.
ती अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोवर आजही चाहते लाईक आणि कमेंट करत असतात. त्याचप्रमाणे तिचे फोटो देखील शेअर करत असते, तर आपल्याला प्रियंका यादव हिने केलेला कुठला चित्रपट आपल्याला आवडतो आम्हाला नक्की सांगा.