‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेत मोनाच्या जागी दिसणार ‘फँड्री’ मधील ही अभिनेत्री

‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेत मोनाच्या जागी दिसणार ‘फँड्री’ मधील ही अभिनेत्री

“राजा राणीची ग जोडी” या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येतच आहेत. शिवाय यात मोठा बदल करण्यात आला आहे. गेल्या अनेक भागांपासून आपण नवनवीन ट्विस्ट बघत आहोत. गणपती बाप्पाच्या स्थापनेच्या शुभमुहूर्तावर अपर्णा ढाले पाटील यांच्या कुटुंबीयांमध्ये येते. तिला पुन्हा आलेले पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात.

रंजीत तिला इथे का आली आहेस, जा असे सांगतो. तरीही ती जात नाही. सुजित म्हणतो की, माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नकोस, तू जा. त्यावर ती म्हणते की, मी अजूनही अपर्णा सुजित ढाले पाटील आहे. मी सहजासहजी सोडणार नाही. तुम्हाला आठवण देण्यासाठी आले की, तुम्हाला मी संपूर्ण बरबाद करेन. तेव्हाच मी शांत होईल.

अजून तुम्ही बरबाद झाला नाहीत. म्हणून मी आले आहे. यावर सर्व कुटुंबीय पुन्हा तणावात येते. गणपती बाप्पाचे पूजन करून विसर्जन करतात. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार रणजीत संजूला सांगतो. सर्व कुटुंबीय मिळून यावर मार्ग काढण्यासाठी ठरवतात. राजश्री वहिनी जास्तच घाबरलेल्या असतात. त्यांना वाटते अपर्णा आता माझी पोल खोलणार. त्यामुळे तिला घालवण्यासाठी ती अनेक मार्ग सांगते.

आईसाहेब तिला हवी तेवढी रक्कम देऊन तिच्यापासून सुजीतला घटस्फोट घेऊन द्या, असे सर्वांना सांगतात. या मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट येत असून काही बदलही झालेले आहेत. गेल्या काही भागांत पासून आपण मोना आपल्याला दिसली नाही. याचे कारण काही दिवसांपूर्वी गुलदस्त्यात होते. पण ते आता समोर आले आहे. पूर्वीची मोना म्हणजे श्वेता खरात ही होती.

श्वेता आता झी मराठी वरील “मन झाला बाजींद” मध्ये प्रमुख भूमिकेचे काम करत असल्यामुळे तिने “राजा राणी ची ग जोडी” ही मालिका सोडली आहे. तर आता नवीन मोना कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले, असतानाच ऐश्वर्या शिंदे ही या मालिकेत आपल्याला नवीन मोनाच्या भूमिकेत दिसणार आहे. ऐश्वर्याने पुणे येथील ललित कला केंद्रात अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले आहे.

ऐश्वर्याने नागराज मंजुळे यांच्या शॉर्ट फिल्म मध्येही काम केले आहे. तहकूब या शॉर्ट फिल्म मधेही तिने काम केले आहे. ही शॉर्टफिल्म खूप गाजली आहे. त्यानंतर तिने फॅन्ड्री, बबन सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहेत.

Team Hou De Viral