चित्रपट सृष्टीत खळबळ ! 18 वर्षाचा संसार अखेर मोडणार, ही लोकप्रिय कलाकार जोडी घेणार ‘घटस्फोट’ पण..

चित्रपट सृष्टीत खळबळ ! 18 वर्षाचा संसार अखेर मोडणार, ही लोकप्रिय कलाकार जोडी घेणार ‘घटस्फोट’ पण..

काही वर्षांपूर्वी ‘व्हाय धिस कोलावरी’ हे गाणे आपण ऐकले असेल. हे गाणे भारतामध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. या गाण्यावरून इतर गाणी देखील बनवण्यात आले होते. काही मीम्स देखील तयार करण्यात आले होते. हे गाणे प्रसिद्ध गायक अभिनेता धनुष याने गायलेले होते.

धनुष हा सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आहे. तो पुन्हा चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे धनुष्य याने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतला आहे. याच दिवशी नितीश भारद्वाज आणि त्यांची पत्नी यांचाही घटस्फोट झाला होता. त्यामुळे या दोन-तीन बातम्या दिवसभरात प्रचंड चर्चेत आल्या होत्या.

धनुष्यच्या घटस्फोटाला एक अभिनेत्री कारणीभूत आहे, असं देखील सांगण्यात येत होते. सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचे 18 वर्षांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले आहे. धनुषने 18 नोव्हेंबर 2004 रोजी रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतशी थाटामाटात लग्न केले होते.

घटस्फोटाबाबत धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर लिहिले की आम्ही मैत्री, जोडपे, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून 18 वर्षांपासून समजूतदारपणा आणि भागीदारीचा मोठा पल्ला गाठला आहे. आज आपण जिथे उभे आहोत तिथून आपले मार्ग वेगळे होत आहेत. आम्ही जोडपे म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या गोपनीयतेचा आदर करा, असे धनुष्य याने त्यावेळेस तेव्हा म्हटले होते. घटस्फोट घेतल्यानंतर आता धनुष आणि ऐश्वर्या यांनी एक वेगळा निर्णय घेतल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

या बातमीनुसार रजनीकांत यांचा जावई धनुष आणि मुलगी ऐश्वर्या यांनी पुन्हा एकदा आपल्या वैवाहिक आयुष्याला दुसरी संधी देण्याचे ठरवले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेतला असला तरी ते दोघे आता एकमेकांना पुन्हा एकदा आजमावून पाहणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.

मात्र, आता त्यांच्या या निर्णयावर काहीजण टीका करताना देखील दिसत आहेत. एकदा घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा दुसरी संधी कशासाठी द्यायची, असे देखील अनेक प्रश्न आता विचारण्यात येत आहे. तर केवळ पैशाची विभागणी इकडे तिकडे करण्यासाठीच हा घटस्फोट घेतला तर नाही ना असे देखील अनेक जण विचारताना दिसत आहे.

तर रजनीकांतचा जावई धनुष्याच्या निर्णयाबाबत आपले काय मत आहे आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral