काजोलसोबत लग्न होण्यापूर्वी ‘या’अभिनेत्रीच्या मागे फिरत असत अजय देवगण, त्या एका घटनेमुळे दोघांचे नाते संपले

काजोलसोबत लग्न होण्यापूर्वी ‘या’अभिनेत्रीच्या मागे फिरत असत अजय देवगण, त्या एका घटनेमुळे दोघांचे नाते संपले

काजोल आणि अजय देवगन बॉलीवूडमधील सर्वात प्रेमळ जोडपे मानले जातते. ही जोडी लोकांच्या पसंतीस उतरली आहे. जरी बहुतेक वेळा चित्रपट कॉरिडोरमध्ये झालेले वैवाहिक नातेसंबंध तुटल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात, परंतु काजोल आणि अजय यांचे नाते गेल्या 17 वर्षांपासून अतूट आहे.

काजोल आणि अजयने एकमेकांना आपले पार्टनर म्हणून निवडले असले, तरी तुम्हाला माहिती आहे का काजोलच्या अगोदर अजयचे हृदय या बॉलीवूड अभिनेत्रीसाठी धडकत असे ? चला तर जाणून घेऊया त्याचे पहिले प्रेम कोण होते…

‘फूल और कांटे’ या अ‍ॅक्शन फिल्मच्या माध्यमातून अजय देवगणने फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला होता आणि आपल्या आगळ्यावेगळ्या स्टाईलने त्याने लोकांची मने जिंकली होती. लोक अजय देवगणच्या ऍक्शनचे वेडे झाले होते, तर कपूर कुटुंबातील ज्येष्ठ कन्या करिश्मा कपूरसाठी अजयच्या हृदयाची धडधड सुरू झाली होती.

करिश्मा आणि अजयचा पहिला चित्रपट जिगर होता. या चित्रपटात दोघांनीही पहिल्यांदा एकत्र काम केले आणि येथूनच या दोघांची जवळीक सुरू झाली. त्यावेळी अजय त्याच्या संघर्षाच्या काळात होता, तर करिश्मा त्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री बनलेली होती. या दोघांनीही एकत्र अनेक चित्रपट केले. दोघांचेही प्रेम वाढतच चालले होते आणि असे म्हटले जाते की हे दोघे बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये देखील राहिले होते.

जिथे अजय वेड्यागत करिश्माच्या प्रेमात पागल झाला होता, तर दुसरीकडे काजोल तिचा मित्र कार्तिक मेहताच्या प्रेमात पडली होती. काजोल तिचा मित्र कार्तिक मेहताला डेट करत होती. त्यावेळी काजोल आणि अजय एकमेकांचे चांगले मित्र होते, जर या बातमीवर विश्वास ठेवला तर काजोल आणि कार्तिक यांच्यात काही चांगले चालत नव्हते, म्हणून काजोल अजयचा सल्ला घ्यायची.

एक दिवस काजोल आणि अजय देवगन एका खोलीत बसून त्यांच्याबद्दल काही गोष्टी सोडवत होते. इतक्यात करिश्माचा फोन आला. चर्चेदरम्यान, करिष्माला समजले की तो एका महिलेबरोबर आहे. याच गोष्टीवरून करिश्मा आणि अजय यांच्यात जुंपली. अजयने हे मान्य केले की हो तो एका बाई बरोबर खोलीत आहे आणि तो तिच्यावर प्रेम करतो. यानंतर दोघे एकमेकांपासून विभक्त झाले.

अजयने लवकरच करिश्मापासून स्वतःला दूर केले आणि त्याचे नाव प्रसिद्ध अभिनेत्री काजोल सोबत जोडू जाऊ लागले. काजोलने एका मुलाखतीत सांगितले की दोघे ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर जवळ आले आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral