अजय बाबतचे ‘ते’ सत्य जाणून काजोलच्या पायाखालची जमीन सरकली, म्हणाली माहिती असत तर मी लग्न केले नसते

अजय बाबतचे ‘ते’ सत्य जाणून काजोलच्या पायाखालची जमीन सरकली, म्हणाली माहिती असत तर मी लग्न केले नसते

बॉलिवूडमधील एक सर्वोत्कृष्ट आणि यशस्वी अभिनेत्री काजोल म्हणाली की जर तिला आपल्या पती अजय देवगन यांचे हे सत्य आधी माहित असते तर मी कधीही त्यांच्याशी लग्न केले नसते. मी अजयला लग्नास नकार दिला असता. वास्तविक, एका खासगी वाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काजोलने हे सांगितले.

अभिनेत्री काजोल एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत होती. या दरम्यान तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली. येथे तिने आपल्या पती अजयसंदर्भात खुलेपणाने बोलली. काजोलला विचारले गेले होते की तू रंग असतीस तर तुला कोणता रंग व्हायला आवडले असते? तिने उत्तर दिले की तिला पांढरा रंग व्हायला आवडले असतं.

तिला विचारले गेले की चांगले कलाकार बनत असतात का ते जन्मतः कलाकार म्हणून जन्म घेतात? यावर काजोलने एक अतिशय संमिश्र उत्तर दिले की, या दोन्हीही गोष्टी समान आहेत, काही जन्मतः कलाकार बनतात तर काही मेहनतीने बनतात.

जेव्हा अँकरने तिला विचारले की अजयने एक अभिनयाच शिक्षण घेतल आहे आणि आपण? या प्रश्नामुळे काजोल स्तब्ध झाली होती, कारण अजयने अभिनयाच शिक्षण घेतलं आहे हे तिला देखील माहिती नव्हतं. ती हसत म्हणाली, मला हे आधी माहित असते तर मी अजयशी लग्नच केले नसते.

दोघांच्या अभिनयाबद्दल काजोल म्हणाली की, अजय आणि मी दोघेही खूप वेगळे कलाकार आहोत. अजय एक तांत्रिक अभिनेता आहे. त्याला कधी अभिनेता व्हायचं नव्हतं, त्याला दिग्दर्शक व्हायचं होतं. पण नशिबाने त्याला अभिनेता बनवलं.म्हणूनच त्याला सर्व अँगल माहिती असतात कुठून कसा शॉट येईल. तो याबाबतीत खूप हुशार आहे.

तो ध्यानात ठेवून प्रत्येक गोष्ट करतो. जर मी माझ्याबद्दल बोलले तर मला या गोष्टी जास्त माहित नाही, मी फक्त अभिनय करते, ते पण पूर्णपणे मुक्त. काजोलच्या माहितीनुसार, तिला हे देखील माहिती नाही की दोघांनी एकत्र किती चित्रपट केले. अंदाजे 6 ते 7 चित्रपट केले असावेत असा ती बोलली.

आम्ही आपापसात याबद्दल फारसे बोलत नाही, असे ती म्हणाली. आम्ही घरात सामान्य जीवन जगतो. आपल्या सासर्‍याशी संबंधित एक किस्सा आठवत तिने सांगितले की, जेव्हा ते प्रथमच भेटले तेव्हा ते करण-अर्जुनच्या सेटवर भेटले होते. त्या वेळी त्यांनी खूप चेष्टा मस्करी केली.

काजोलला आजही बरेच पुस्तके वाचण्याचा छंद आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिच्याकडे 2 हजाराहून अधिक पुस्तके आहेत. तिला पुस्तके वाचायला आवडतात आणि तिचं पुस्तकांवर एक विशेष प्रेम देखील आहे. त्याचबरोबर तिने सांगितले की तिच्या मुलांना तिचा एकही चित्रपट आवडत नाही.

कारण प्रत्येक चित्रपटात ती रडताना दिसत आहे. काजोलने सांगितले की, तिच्या वडिलांना तिचे नाव लहानपणी मर्सिडीज असे ठेवायचे होते, जर माझे नाव खरोखर हे ठेवले गेले असते तर आज टोपण नाव मेस्सी असते. काजोलने आपल्या शाळेचे दिवस आठवत सांगितले की तिच्यावर कधीही रॅगिंग झालेली नाही.

उलट तिने लोकांची रॅगिंग घेतली आहे. तिला विचारले गेले होते की तुमची चौथी पिढी अभिनयात आहे, तुम्ही कोणास अभिनयात जवळचा मानता? ती म्हणाली मी माझ्या आईसारखे दिसते, बर्‍याच वेळा असे वाटते की मी तिच्यासारखेच करत आहे.

Team Hou De Viral