बॉलिवूडला पुन्हा हादरा ! अजय देवगनच्या घरी कोसळला दुःखाचा डोंगर, अजय देवगनच्या भावाचे नि-धन

बॉलिवूडला पुन्हा हादरा ! अजय देवगनच्या घरी कोसळला दुःखाचा डोंगर, अजय देवगनच्या भावाचे नि-धन

वर्ष 2020 बॉलीवूडसाठी खूपच वाईट रीतीने जात आहे. आता बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अजय देवगन यांच्या घरी दु: खाचा डोंगर कोसळला आहे. बॉलिवूड दिग्दर्शक आणि अजय देवगनचा भाऊ अनिल देवगन यांचे सोमवारी रात्री नि-धन झाले. त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण देवगन कुटुंबात दु: खाचे वातावरण आहे.

स्वत: अजय देवगन यांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. याचबरोबर सांगितले की साथीच्या आजारामुळे प्रार्थना सभा होणार नाही. अनिलने देवगन यांनी 1996 मध्ये आलेला सनी देओल, सलमान खान आणि करिश्मा कपूर यांच्या ‘जीत’ या चित्रपटाद्वारे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.

याबाबत माहिती देताना अजय देवगनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की काल रात्री मी माझा भाऊ अनिल देवगन यांना गमावले. त्यांच्या अकाली निधनाने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अजय देवगन फिल्म्स आणि मला त्याची खूप आठवण येईल. त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा. साथीच्या रोगामुळे आम्ही खासगी प्रार्थना सभा घेणार नाही. त्यासोबत अजय देवगनने आपल्या भावाचे छायाचित्र शेअर केले.

2000 मध्ये अनिलने दिग्दर्शक म्हणून पहिला राजू चाचा चित्रपट बनविला. या चित्रपटात काजोल, ऋषी कपूर आणि संजय दत्त यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. राजू चाचा हा अजय देवगणचा पहिला होम प्रोडक्शन चित्रपटही होता. त्यानंतर 2005 मध्ये ब्लॅकमेल आणि 2008 मध्ये हाल-ए-दिल आला. यापैकी ब्लॅकमेलमध्ये अजय देवगन देखील मुख्य भूमिकेत होता.

अजयच्या ‘सन ऑफ सरदार’ या दुसर्‍या चित्रपटात तो क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होता. त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती. जीत या चित्रपटाशिवाय अनिल यंजी अजय देवगनच्या जान, इतिहास, प्यार तो होना ही था आणि हिंदुस्तान की कसम या चित्रपटांमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

आता अजय देवगणच्या ट्विटवरही त्याच्या भावाच्या नि-धनामुळे चाहते शोक व्यक्त करत आहेत. याशिवाय अनिल कपूर, अभिषेक बच्चन, बोनी कपूर, दिग्दर्शक मुकेश छाबरा यांच्यासह अनेक स्टार्स यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. गेल्या वर्षी 27 मे रोजी अजयचे वडील अ‍ॅक्शन डायरेक्टर वीरू देवगन यांचे निधन झाले होते.

Hou De Viral – होऊ दे व्हायरल कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Team Hou De Viral