‘अजिंक्य देव’ यांच्या मुलाला पाहिलंत का? आहे प्रसिद्ध कलाकार

‘अजिंक्य देव’ यांच्या मुलाला पाहिलंत का? आहे प्रसिद्ध कलाकार

बॉलीवूड मध्ये मराठी कलाकार हे फार ओघानेच दिसतात. मात्र, काही कलाकार हे असे दमदारपणे अभिनय करतात की त्यांचा दबदबा हा कायमस स्मरणात राहतो. यातीलच एक अभिनेता म्हणजे अजिंक्य देव. हँडसम लुक आणि दमदार अभिनयाच्या जोरावर अजिंक्य देव यांनी बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट गाजवून सोडलेले आहेत.

अजय देवगन सोबत तक्षक या चित्रपटात त्यांनी अफलातून असे काम केले होते. त्याचबरोबर नुकत्याच म्हणजेच दोन वर्षांपूर्वी आलेल्या तानाजी द अनसंग वरियार या चित्रपटातही त्यांनी अतिशय जबरदस्त अशी भूमिका साकारली होती. अजिंक्य देव यांना घरातूनच चित्रपटाचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील रमेश देव हे दिग्गज अभिनेते होते, तर आई सीमा देव या देखील अभिनेत्री होत्या.

आता अजिंक्य देव देखील आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत असतात. काही वर्षांपूर्वी ‘दृष्ट लागण्या जोगे सारे’ या गाण्यांमध्ये त्यांनी अफलातून असे काम करून सगळ्यांचीच मला जिंकली होती. अजिंक्य देव यांना एक मुलगा असून तो देखील बॉलीवूडमध्ये सक्रिय आहे. अजिंक्य देव यांच्या मुलाचे नाव आर्य देव असे आहे.

आर्य देव हा बॉलीवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शकांचे काम करतो. अजिंक्य देव हे अतिशय लोकप्रिय असे अभिनेते आहेत. अजिंक्य देव यांच्या पत्नीचे नाव आरती देव असे आहे. आरती देव या चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. अजिंक्य देव हे पार्ला येथे कॉलेजमध्ये शिकत होते. ते बीएससी करत होते. त्याच वेळेस त्यांनी आरती यांना पाहिले होते. त्यानंतर ते त्यांच्या प्रेमात पडले.

त्यानंतर डिसेंबर 1986 मध्ये या दोघांनी लग्न देखील केले. या दोघांना दोन मुले असून मोठ्या मुलाचे नाव आर्य असे आहे. मोठा मुलगा आर्य हा बॉलीवूडमध्ये सक्रिय असून तो सहाय्यक दिग्दर्शनाचे काम करतो, तर त्यांची मुलगी ही मात्र विशेष आहे. याच कारणामुळे या दांपत्याने विशेष मुलांसाठी एक शाळा उघडली असून या शाळेच्या माध्यमातून ते विशेष मुलांसाठी अतिशय चांगली असे काम करत असतात.

या दोघांच्या संसाराला 37 वर्षाचा काळ लोटला असला तरी आजही दोघेही चीर तरुण असल्याचे दिसते. तर मित्रांनो तुम्हाला अजिंक्य देव यांनी केलेला कुठला चित्रपट आजवर सर्वाधिक आवडला ? ते आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral