भिजवलेली ‘अक्रोड’ खाऊन कॅन्सर आणि मधुमेह सारख्या आजारांवर करा मात… जाणून घ्या उपाय..

भिजवलेली ‘अक्रोड’ खाऊन कॅन्सर आणि मधुमेह सारख्या आजारांवर करा मात… जाणून घ्या उपाय..

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना सध्या असाध्य आजारांचा सामना करावा लागत आहे. आपण बाहेरचे खाणे खाऊन देखील या आजारांना अधिक निमंत्रण देत आहोत. सकस आहार घेतला तर आपल्याला कुठलाही आजार जडत नाही. यासोबतच आपल्याला व्यायाम आणि इतर योगा अभ्यास करणे गरजेचे असते. मात्र, आजकाल व्यायाम करायला देखील अनेकजवळ वेळ नसतो. त्यामुळे आपण आहार- विहारावर लक्ष ठेवून इतर आजारांपासून आपला बचाव करू शकतो.

आम्ही आपल्याला आज अक्रोडाचे महत्त्व सांगणारा आहोत. अक्रोड हे असे फळ आहे की, हे खाल्ल्याने आपल्याला मेंदू सह इतर आजारांवर उपयोग होऊ शकतो.अक्रोडमध्ये विटामिन, मिनरल, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॉपर सेलेनियम यासारखे महत्त्वाचे घटक असतात. एवढे घटक इतर कुठल्याही पदार्थात मिळत नाही. त्यामुळे बदामाचे सेवन करून आपण अनेक आजारावर मात करू शकतो.

1) बद्धकोष्टता : बाहेरचे खाणे, रात्रीचे जागरण आणि इतर कारणांमुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. सकाळी उठल्या उठल्या आपली संडास साफ झाली नाही तर आपल्याला दिवस चांगला जात नाही. त्यामुळे आपली पचनक्रिया ही चांगली पाहिजे. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या दोन-तीन अकोरोड सेवन करावे. यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. अक्रोडमध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.

2) मधुमेह : अक्रोडमध्ये ओमेगा ऍसिड आणि एंटऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अक्रोडचे सेवन नियमित केल्याने आपल्याला आपली शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवता येऊ शकते. तसेच आपल्याला टाईप टू डायबिटीस नियंत्रणात यामुळे आणता येते. त्यामुळे अक्रोडचे सेवन नियमितपणे करावे.

3) हाडे मजबूत : ज्या लोकांना हाडे कमकुवत असल्याची समस्या आहे, अशा लोकांनी अक्रोडचे सेवन करावे. अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतात. तसेच अक्रोडमध्ये लीनोनिक ऍसिड असते तसेच ओमेगा-3 ऍसिड देखील असते. त्यामुळे आपले हाडे मजबूत होतात.

4) हृदय : अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा-3 ऍसिड असते. ज्या लोकांचे हार्टबीट वाढलेले आहेत, अशा लोकांनी अक्रोडचे नियमितपणे सेवन करावे. यामुळे आपल्याला ह्रदयाची समस्या येणार नाही आणि आपला उच्च रक्तदाब नियंत्रणात राहील.

5) कॅन्सर : अक्रोडचे सेवन करून आपण कॅन्सरवर देखील मात करू शकता. प्रोटेस्ट, ब्रेस्ट आणि कोलो रेक्टल कॅन्सर यावर आपण मात करू शकता. मात्र, आपल्याला नियमितपणे अक्रोडचे सेवन हे करावे लागेल. अक्रोडमध्ये फॉलोपॅनल आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असतात. याचे सेवन करून आपण कॅन्सरसारख्या असाध्य आजारावर नियंत्रण मिळवू शकता.

6) गरोदर महिला : गरोदर महिलांना सकस आहार देणे हे गरजेचे असते. त्यामुळे गरोदर महिलांनी अक्रोडचे सेवन करावे. यामुळे पोटात असलेला गर्भ चांगला विकास होतो. ओमेगा-3 ऍसिडमुळे मुलाचा विकास चांगला होतो.

7) प्रतिकारशक्ती : ज्या लोकांची प्रतिकारशक्तीही कमी होते आहे, अशा लोकांनी अक्रोडचे नियमितपणे सेवन केले पाहिजे. यामुळे अशा लोकांची प्रतिकारशक्तीही नक्कीच वाढीस लागते आणि त्यांना नवीन ऊर्जा ही प्राप्त होत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral