‘तुझ्यात जीव रंगला’ मधल्या ‘अंजलीबाई’ ने दिली ‘गुडन्यूज’

‘तुझ्यात जीव रंगला’ मधल्या ‘अंजलीबाई’ ने दिली ‘गुडन्यूज’

तुझ्यात जीव रंगला ही मालिका काही वर्षांपूर्वी झी मराठी या वाहिनीवर सुरू होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेमधील सगळ्याच भूमिका लोकप्रिय ठरल्या होत्या. मात्र, विशेष करून राणादा आणि पाठक बाई यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

राणादाच्या भूमिकेमध्ये या मालिकेत आपल्याला अभिनेता हार्दिक जोशी हा दिसला होता. त्याने अतिशय जबरदस्त रांगडी अशी भूमिका मालिकेत केली होती, तर पाठक बाईच्या भूमिकेमध्ये आपल्याला अक्षय देवधर ही दिसली होती. या दोघांनी काही दिवसापूर्वी साखरपुडा केला आहे आणि आता हे दोघे लग्न कधी करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती, तर आम्ही आपल्याला याबद्दलच माहिती देणार आहोत.

मध्यंतरी अक्षया देवधर आणि सुजय टिळक यांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू असल्याची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. हे दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसत होते. मात्र, दोघांनी देखील या वृत्ताचे खंडन केले होते. हार्दिक जोशी हा अलीकडेच आपल्या तुझ्या माझ्या संसाराला अनेक काय हवं या मालिकेमध्ये दिसला होता.

या मालिकेमध्ये त्याने अतिशय जबरदस्त अशी भूमिका केली होती, तर अक्षय देवधर हिने देखील अनेक मालिकांचे चित्रीकरण केले. हार्दिक जोशी आणि अक्षय देवकर यांनी काही दिवसापूर्वी साखरपुडा उरकला होता. त्यांच्या साखरपुड्याला अनेक कलावंत देखील उपस्थित होते. तसेच त्यांना अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

मात्र, आता हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याची बातमी गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, आता त्याला दुजोरा मिळत आहे. कारण की हार्दिक जोशी याच्या मैत्रिणीने त्याचा एक फोटो शेअर करून आता फक्त सहा दिवस असे म्हटले आहे. त्यामुळेच आता हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे समोर येत आहे.

एक किंवा दोन डिसेंबर रोजी हे दोघेही लगीनगाठीत अडकणार आहेत. त्यामुळे ही जबरदस्त जोडी आपला संसार नेटाने करेल, असे देखील अनेकांना वाटत आहे, तर आपल्याला हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांची जोडी आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral