‘बिगबॉस’ च्या घरातून अक्षय वाघमारे घराबाहेर, या कारणामुळे झाला बेघर

‘बिगबॉस’ च्या घरातून अक्षय वाघमारे घराबाहेर, या कारणामुळे झाला बेघर

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या मराठी बिग बॉस मधून पहिलं एविक्शन झालं आहे. मराठमोळा अभिनेता अक्षय वाघमारे हा आता घराबाहेर पडला आहे. याचे कारण आज अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने वि श द करत आहेत. मात्र, तो घराबाहेर का पडला याचा शोध घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठी बिग बॉसमध्ये स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देण्यात येतात. आता नुकत्याच झालेल्या भागामध्ये मीरा जगन्नाथ हिला अनेकांनी सुनवले. मीरा जगन्नाथ ही खूप दुसऱ्याला घालून, पाडून बोलते, असे अनेकांचे म्हणणे होते. मला हे नको होते. त्यामुळेच ती आता वेगळी पडते का हे पाहावे लागेल.

गेल्या भागामध्ये सोनाली पाटील, सुरेखा कुडची आणि इतरांनी तिच्यावर टीका केली. ती नेहमीच वेगळ्या पद्धतीने वावरत असते, असे त्यांचे म्हणणे होते. मीरा जगन्नाथ हिने या सर्वांचे खंडन केले होते. अक्षय वाघमारे आता घराबाहेर पडला आणि त्याच्या जागी आदीश वैद्य हा वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन शोमध्ये आला आहे.

त्यामुळे आता विकास, उत्कर्ष यांच्या टीम मध्ये तो सहभागी होण्याची 99% शक्यता आहे. मात्र, तो दुसऱ्या गटामध्ये देखील सहभागी होऊ शकतो, असे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता तो कोण्या गटामध्ये सहभागी होतो, हे देखील पाहणे फार मजेशीर ठरणार आहे. घरांमध्ये सह भागी झाल्या झाल्या महेश मांजरेकर यांनी त्याला काही प्रश्न विचारले.

त्यावर त्याने देखील दिलखुलास असे उत्तर दिले. यावर त्याने जय याच्या बाबत एक मत व्यक्त करताना सांगितले की, तो खूप अग्रेशन आहे. तसेच महेश मांजरेकर यांनी त्याला विचारले की ,तुला तीन स्पर्धक आवडतात. त्यावर देखील आदेशाने चांगले उत्तर दिले. त्याने सोनाली पाटील, विशाल याचे नाव घेतले.

तर आता या शोमध्ये अजूनच मजा येणार आहे. स्नेहा वाघ हिच्यासोबत देखील आदेश हा चर्चा करताना दिसत आहे. मुळात अक्षय वाघमारे हा अतिशय उत्कृष्ट असा स्पर्धक या शोमध्ये होता. मात्र त्याचे शो मधून एविक्शन का झाले, याची देखील आता कारणं वेगवेगळी समोर येत आहेत. अक्षय वाघमारे हा ठराविक लोकांच्या संपर्कात शोमध्ये येत होता.

म्हणजे उत्कर्ष आणि विशाल तसेच जय यांच्या सोबत असतो. तो अनेकदा तो चर्चा करताना दिसत होता. त्यांच्याशी बोलतो, काही पण निर्णय घेत होता. इतर सदस्य घरात नाहीत, असेच तो समजत होता. त्यामुळे त्याला कमी मतं मिळाल्याचे सांगण्यात येते. प्रेक्षक देखील त्याच्यावर यामुळेच नाराज झाले.

इतरांशी त्याच बॉण्डिंग नव्हते, असे देखील सांगण्यात येते. आता उत्कर्ष आणि त्याच्या गटाचे एक मत कमी झाले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी येत्या भागामध्ये वाढणार आहेत. अक्षय वाघमारे याच्या बद्दल आपल्याला काय वाटते आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral