‘बिगबॉस’ मधील या स्पर्धकाने घेतला अवयवदानाचा निर्णय, बघा कोण आहे तो

‘बिगबॉस’ मधील या स्पर्धकाने घेतला अवयवदानाचा निर्णय, बघा कोण आहे तो

एखादा चित्रपट हिट करायचा असेल तर त्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत असतात. म्हणजे उदाहरण घ्यायचे झाले तर आपण काही वर्षांपूर्वी बाजीराव-मस्तानी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या आधी पेशव्यांच्या वंशजांनी मोठा वाद निर्माण केला होता. त्यानंतर हा चित्रपट अनेकांनी पाहिला.

चित्रपटाची प्रसिद्धी करणे हा यामागचा मुख्य हेतू असतो, असे अनेकदा घडलेले आहे. आता कलर्स मराठीवर सुरू झालेल्या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या भागामध्ये देखील असेच प्रकार काहीजणांनी केल्याचे समोर आलेले आहे. आज आम्ही आपल्याला याबद्दलच माहिती देणार आहोत. मराठी बिग बॉसमध्ये अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत.

मात्र, यातील काही स्पर्धक आपली छाप सोडून गेले आहेत. यामध्ये अक्षय वाघमारे हा अभिनेता देखील सहभागी झाला आहे. मात्र, अक्षय वाघमारे याची चर्चा ही होतांना दिसत नाही. तो अतिशय शांत, संयमी असा आहे, तर या शो मध्ये जय दुधाने मीरा जगन्नाथ, सुरेखा कुडची यांच्यासह इतर कलाकार देखील सहभागी झाले आहेत.

बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झाले आहेत. एक घटस्फोटित जोडी देखील चांगलीच चर्चेत आली आहे. या जोडीचे नाव अनुक्रमे स्नेहा वाघ आणि अविष्कार दारव्हेकर असे आहे. स्नेहा आणि अविष्कार यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, तब्बल नऊ वर्षांचा संसार केल्यानंतर या दोघांनीही एकमेकांना पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

अविष्कार हा मला मारझोड करत होता. त्याचप्रमाणे तो मला खूप त्रास देतो, असे स्नेहा हिने सांगितले होते. त्यानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. बिग बॉसच्या घरात देखील स्नेहा हिने सुरेखा कुडची यांच्या सोबत बोलताना याबाबत खुलासा केला होता. त्यानंतर अविष्कार याला ही गोष्ट आवडली नव्हती.

अविष्कार देखील उत्कर्ष याच्या सोबत बोलताना स्नेहा विषयी सांगत होता. या शोमध्ये भुमता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई देखील सहभागी झाल्या आहेत. तृप्ती देसाई या शो मध्ये सहभागी झाल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र, टीकाकारांकडे दुर्लक्ष करून त्या या शोमध्ये आता चांगल्या बाजी मारताना दिसत आहेत.

एका भागामध्ये तृप्ती यांनी महिलांच्या अंगावरच घरातील कचरा आणि साबणाचे पाणी टाकल्याने त्यांच्यावर अनेक प्रेक्षकांनी टीका केली. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केले होते. अक्षय वाघमारे हादेखील अतिशय छान असा अभिनेता आहे. त्याने अनेक मालिका चित्रपटात काम केले आहे.

काही दिवसांपूर्वी अक्षय याचा एक व्हिडिओ शेअर झाला आहे. बिग बॉसच्या घरातमध्ये सहभागी होण्याच्या आधी अक्षय यांनी मरणोत्तर अवयव दान देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते. याबाबतचे संमतीपत्र देखील त्याने संबंधितांकडे दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अक्षय याच्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

तर काही जणांनी म्हटले आहे की, केवळ प्रसिद्धीसाठी अक्षयने हा सगळा खटाटोप केला आहे.

Team Hou De Viral