लग्नानंतर राणादा व अंजलीबाई पोहचले ‘या’ ठिकाणी, फोटो झाले व्हायरल

लग्नानंतर राणादा व अंजलीबाई पोहचले ‘या’ ठिकाणी, फोटो झाले व्हायरल

मराठी चित्रपट, मालिका विश्वातील आघाडीची जोडी म्हणून अक्षय देवधर आणि हार्दिक जोशी यांच्याकडे पाहिले जाते. या जोडीने काही दिवसापूर्वी पुण्यातील ढेपेवाडा येथे आलिशान पद्धतीने लग्न केले. मराठी चित्रपटातील काही कलावंतांची उपस्थिती देखील यावेळी पाहायला मिळाली. मराठीतील ही आदर्शवत असणारी जोडी आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते. यादरम्यान दोघांची खूप घट्ट मैत्री झाली होती. त्यानंतर या दोघांचा प्रेमाचा धागा फुलला, असे सांगण्यात येत होते. मात्र, मध्यंतरी अक्षया देवधर हिचे नाव सुजय टिळक या अभिनेत्यासोबत देखील जोडले गेले होते. हार्दिक आणि अक्षय देवधर एकमेकांच्या प्रेमात असल्याचे देखील सांगण्यात येत होते.

मात्र, अक्षया देवधर किंवा सुजय टिळक या दोघांनीही याबाबत कधीही काही माहिती सांगितले नाही. कालांतराने या दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली. तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतर हार्दिक जोशी आपल्याला तुझ्या माझ्या संसाराला अणिक काय हवं या मालिकेमध्ये देखील दिसला होता. ही मालिका देखील त्याची चांगली चालली होती.

यानंतर या दोघांनी अलीकडे साखरपुडा केला होता. त्यानंतर या दोघांनी लगीन गाठ बांधली. आता ही जोडी एकत्र फिरताना दिसत आहे. अलीकडेच अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे नाशिक दौऱ्यावर गेले होते. नाशिक दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांनी एका देवीचे दर्शन घेतले. सहाजिकच हे दोघेही वणीच्या देवीच्या दर्शनाला गेले होते. म्हणजेच सप्तशृंगी मातेचे या दोघांनी दर्शन घेतले.

गडावर पोहोचल्यानंतर या दोघांसोबत फोटो काढण्यासाठी अनेकांची चढाओढ लागली होती. तसेच अनेकांनी मोठी गर्दी देखील केली होती. लोकांना आवरण्यासाठी येथे बाऊन्सरला देखील बोलावण्यात आले होते. त्यामुळे एकच धावफळ उडाली होती. एकूणच काय अक्षय देवधर आणि हार्दिक जोशी यांनी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले आहे.

Team Hou De Viral