‘लेक चालली सासरला…’, अक्षयाची पाठवणी करतांना सगळ्यांच अश्रू अनावर, पहा विडिओ

‘लेक चालली सासरला…’, अक्षयाची पाठवणी करतांना सगळ्यांच अश्रू अनावर, पहा विडिओ

झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादा आणि पाठक बाई हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पाठक बाई व राणा दादा पोहोचले आहेत.प्रेक्षकांच्या मनावर या मालिकेतून ते अधिराज्य करत आहेत. या दोघांच्या अभिनयाने ही मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

या मालिकेतील कथानक हे इतर मालिकांपेक्षा वेगळे असल्यामुळे प्रेक्षकांनी ही मालिका आवर्जून पाहिली आहे. पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर आणि राणा दादा म्हणजे हार्दिक जोशी या दोघांचे 2 डिसेंबर रोजी लग्न झाले आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. चात्यांना हे फोटो पाहताना खूप आनंद होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या दोघांच्या लग्नाचे विधी अगदी धुमधडाक्यात करण्यात आले आहेत. पुण्यात दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. सकाळी त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली. दोघांनी सप्तपदी घेतल्या. लग्नात दोघेही पारंपरिक रुपात अतिशय सुंदर दिसले. नऊवारीत अक्षया सुंदर दिसत होती . संध्याकाळी रिसेप्शन देण्यात आले होते.

यावेळी दोघांच्या ड्रेसचा रंग एक सारखाच होता .या दोघांनी जांभळ्या रंगाचे ड्रेस घातले होते. अक्षयाने जांभळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. तिचे रूप अधिकच खुलून आले होते. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी साताजन्माच्या गाठीत अडकले आहेत.

आई-वडील आणि कुटुंबीयांनी लावलेली माया तिच्या डोळ्यात तरळत होती. आता तिचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये ती आपल्या अश्रुंना मोकळी वाट करून देतानाच आजवर माहेरच्यांनी केलेल्या त्यागाचेही स्मरण करते आहे, असेच यातून दिसत आहे. अशा काही प्रतिक्रयाही चाहत्यांनी दिल्या आहेत.

Team Hou De Viral