लाईम लाईट पासून दूर राहते अक्षय कुमारची बहिण, 15 वर्षापेक्षा मोठ्या उद्योगपतीशी केले लग्न

लाईम लाईट पासून दूर राहते अक्षय कुमारची बहिण, 15 वर्षापेक्षा मोठ्या उद्योगपतीशी केले लग्न

बॉलिवूडमध्ये आज आघाडीच्या अभिनेत्याचे नाव घ्यायच म्हटल तर अक्षय कुमार यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते. अक्षय कुमार याने आपल्या करीयरची सुरुवात ही अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून केली होती. अक्षय कुमार हा सुरुवातीच्या काळामध्ये हाँगकाँग येथे फाइव स्टार हॉटेलमध्ये काम देखील करायचा. तो येथे नोकरीला होता.

त्यानंतर त्याने तेथे ब्लॅक बेल्ट मिळवला आणि त्यानंतर हळूहळू त्याने चित्रपटात पदार्पण करण्यास सुरुवात केली.सुरुवातीला त्याने काही छोट्या-मोठ्या चित्रपटात भूमिका केल्या. मात्र, खऱ्या अर्थाने त्याला ओळख मिळाली ती अब्बास-मस्तान यांच्या खिलाडी या चित्रपटात. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपक तिजोरी याची देखील भूमिका होती. या दोघांनी हा चित्रपट अक्षरशः गाजवला होता.

त्या काळी या चित्रपटाची भरपूर चर्चा झाली होती. त्यानंतर अक्षय कुमार याला अनेक चित्रपट मिळाले. मोहरा चित्रपटातील त्याने केलेली पोलिस निरीक्षकाची भूमिका देखील प्रचंड गाजली होती. या चित्रपटातील गाणीही खूप गाजली होती. त्यानंतर त्याचे नाव रविना टंडनसोबत जोडले गेले. त्यानंतर रविना टंडन आणि त्याचे बराच काळ प्रेमप्रकरण सुरू होते, असे सांगण्यात येते.

मात्र, ट्विंकल खन्नाशी अक्षय कुमारचे काहीतरी सुरू असल्याची कुणकुण रविना टंडन ला लागली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये नंतर बिनसले. त्यानंतर अक्षय कुमार याचे शिल्पा शेट्टीसोबतही प्रेम प्रकरण होते. नंतर अक्षय कुमार याने तिला देखील धोका दिला, असे शिल्पा शेट्टी हिने जाहीर कार्यक्रमात सांगितले. त्यानंतर पूजा बत्रा याच्या सोबत देखील अक्षय कुमारचे प्रेम प्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे.

अक्षय कुमार कडे सध्या अनेक चित्रपटांच्या ऑफर आहेत. अक्षय कुमार आपल्या दान धर्मासाठी अतिशय प्रसिद्ध असा समजला जातो. कोरोणा काळामध्ये त्याने कोट्यवधी रुपये पंतप्रधान निधी मध्ये दिलेले आहेत. तसेच मुंबई पोलिसांसाठी देखील त्याने कोट्यवधी रुपये दिले आहेत. अक्षय कुमारकडे सध्या काही चित्रपटांच्या ऑफर असून त्याचे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते.

आज आम्ही आपल्याला अक्षय कुमार याच्या बहिणी बाबत माहिती देणार आहोत. अक्षय कुमारची बहीणही लाईमलाईट पासून दूर राहते. अक्षय कुमारच्या बहिणीचे नाव अलका भाटिया असे आहे आणि ती जवळपास चाळीस वर्षाची आहे. अक्षय कुमार सारखी ती अतिशय गोरीगोमटी आहे. मात्र, अक्षय कुमार यांचा त्यांच्या लग्नाला फार मोठा विरोध होता.

याचे कारण म्हणजे अलका ही तिच्यापेक्षा वयाने पंधरा वर्षे मोठ्या व्यक्ती सोबत लग्न केले आहे. ही व्यक्ती दुसरी कोणी नसुन प्रसिद्ध उद्योगपती आहे. या व्यक्तीचे नाव सुरेंद्र हिरानंदानी असे आहे. सुरेंद्र हे अलका पेक्षा जवळपास पंधरा वर्षांनी मोठे आहेत. या दोघांचा विवाह सोहळा काही महिन्यापूर्वी पार पडला होता.

या विवाहाला अक्षयकुमारचा विरोध असला तरी दोघांनी लग्न केले. त्यानंतर ही जोडी हनिमून साठी तुर्की येथे फिरायला गेली होती. या दोघांना सध्या मूलबाळ नसल्याचे सांगण्यात येते. अक्षय कुमारची बहिण जरी असली तरी अलका ही लाईम लाईट पासून अतिशय दूर राहते.

Team Hou De Viral