खोलीत आमिर ने केले होते असे काही ‘कृत्य’ ज्यामुळे अल्का याज्ञिकने आमिरला काढले होते खोलीबाहेर, जाणून घ्या किस्सा

खोलीत आमिर ने केले होते असे काही ‘कृत्य’ ज्यामुळे अल्का याज्ञिकने आमिरला काढले होते खोलीबाहेर, जाणून घ्या किस्सा

२० मार्च रोजी बॉलिवूड गायिका अल्का याज्ञिक यांचा ५८वा वाढदिवस होता. वयाच्या १४व्या वर्षा अल्का यांनी म्यूझिक इंडस्ट्रीमधील करिअरला सुरुवात केली होती. आज त्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका म्हणून ओळखल्या जातात. एकदा अल्का यांनी ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळचा एक प्रसंग सांगितला होता.

या चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी अल्का याज्ञिक यांनी आमिर खानला चक्क खोलीबाहेर काढले होते. अल्का यांच्या वाढदिवशी चला जाणून घेऊया आमिर खान आणि त्यांचा किस्सा…अल्का याज्ञिक यांनी एकदा ‘माय लाइफ, माय स्टोरी’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी आमिरसोबत घडलेला एक जबरदस्त किस्सा सांगितला होता.

‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळचा हा किस्सा सांगितला. ‘गजब का है दिन..’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी हा घडला होता. आमिर खानला खोली बाहेर काढण्याएवढं नक्की काय झालं होतं? असा प्रश्न आता अनेकांना पडला असेल.आमिरचा किस्सा सांगताना त्या म्हणाल्या होत्या, “मी कयामत से कयामत तक या सिनेमातील गजब का है दिन या गाण्याचे रेकॉर्डिंग करत होते.

तेव्हा माझ्या रेकॉर्डिंगच्या खोलीत एक देखणा मुलगा बसला होता. सुरुवातीला तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि माझा गाण्याचा सराव करत राहिले. पण गाणे रेकॉर्ड करण्याची वेळ आली तेव्हा मी खूप अस्वस्थ झाले. तुम्ही गात असताना कोणीतरी तुमच्याकडे एकटक पाहात आहे असं तुम्हाला जाणवलं तर तुम्ही अस्वस्थ होता.

त्यामुळे मी त्याला त्या खोलीच्या बाहेर जायला सांगितले. तो सुद्धा काहीही न बोलता तिथून निघून गेला.”पुढे त्या म्हणाल्या, “गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यानंतर दिग्दर्शक मन्सूर खान यांनी या सिनेमातील नायकाशी माझी ओळख करून दिली. त्याक्षणी मला प्रचंड लाज वाटली.

कारण याच नायकाला मी काही वेळापूर्वी खोलीच्या बाहेर काढलं होतं. त्यानंतर आजपर्यंत आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा आमिर मला त्या गोष्टीची आठवण करून देतो आणि आम्ही दोघेही त्यावर जोरजोरात हसतो.”

Team Hou De Viral