लग्नानंतरही 27 वर्ष पतीपासून दूर का राहिल्या अलका याग्निक? स्वतः केला धक्कादायक खुलासा

लग्नानंतरही 27 वर्ष पतीपासून दूर का राहिल्या अलका याग्निक? स्वतः केला धक्कादायक खुलासा

बॉलिवूडध्ये असा एक काळ होता, जेव्हा आयटम साँग नाही तर गाण्याचे बोल ऐकून त्यांना लोकांची पसंती मिळायची. हाच सुंदर काळ खऱ्या अर्थानं अनुभवला ज्येष्ठ गायिका अलका याग्निक यांनी. आज त्यांचा 55 वा वाढदिवस आहे. हिदी सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट गाणी देणाऱ्या अलका याग्निक यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊ.

अलका याग्निक यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षीच संगीत क्षेत्रात पदार्पण करत आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी तब्बल सोळा भाषांमध्ये दोन हजाराहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. संगीत क्षेत्रात यशाचं शिखर गाठलेल्या अलका यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे.

गायिकेनं 1989 साली शिलॉन्गच्या नीरज कपूर नावाच्या व्यावसायिकासोबत लग्नगाठ बांधली. मात्र, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की लग्नानंतरही ही जोडी 27 वर्षाहून अधिक काळ एकमेकांपासून दूर राहात होती.नीरज यांचा व्यावसाय शिलॉन्गमध्ये होता आणि अलका यांचं बहुतेक काम हे मुंबईतूनच होत असे. ही परिस्थिती पाहाता दोघांनाही एकमेकांपासून लांब राहाण्याशिवाय पर्याय नव्हता.

मात्र, इतका काळ दूर राहूनही त्यांचं नातं अत्यंत घट्ट राहिलं. सुट्टी मिळाल्यावर नीरज कधीतरी मुंबईला यायचे मात्र बहुतेक काळ अलका यांनी सिंगल मदर बनतच आपल्या मुलांचा सांभाळ केला. अलका यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं, की नीरजनं मुंबईत बिजनेस सुरू करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, एका लहान शहरातून असल्यामुळे मुंबईत बिजनेस सुरू करणं त्यांना शक्य झालं नाही. मुंबईत बिजनेस सुरू केल्यानंतर त्यांचं बरच आर्थिक नुकसान झालं. यानंतर अलका यांनीच त्यांना शिलॉन्गमध्येच बिजनेस करण्याचा सल्ला दिला आणि पुढे नीरज यांनी तिथेच आपलं काम सुरू ठेवलं.

Team Hou De Viral