चित्रपटात ‘बहीण-भाऊ’ म्हणून दिसलेली जोडी खऱ्या आयुष्यात आहे ‘नवरा-बायको’

चित्रपटात ‘बहीण-भाऊ’ म्हणून दिसलेली जोडी खऱ्या आयुष्यात आहे ‘नवरा-बायको’

बॉलीवूडमध्ये काही वर्षांपूर्वी अभिनेत्री करीना कपूर हिला प्रश्न विचारण्यात आला होता की, रणबीर कपूर सोबत रोमान्स करायला आवडेल का? त्यावर करीना कपूर हिने क्षणाचाही विचार न करता नाही, असे उत्तर दिले होते. कारण की तू माझा चुलत भाऊ आहे असे म्हटले होते.

मात्र, या उलट आता एका रियल लाईफ मध्ये पती-पत्नी असणाऱ्या अभिनेता व अभिनेत्री यांनी एका चित्रपटात बहीण भावाची भूमिका केल्याचे समोर आले आहे. याबद्दलच आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. या अभिनेत्याचे नाव आलोक राजवाडे आणि पर्ण पेठे असे आहे. पर्ण पेठे ही एक सुंदर अभिनेत्री आहे. तिने चित्रपटासोबत अनेक नाटकांमध्ये ही काम केले आहे.

तिचे अडलयं का? हे नाटक सध्या प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडत आहे. तिकीट बारीवर या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. येणाऱ्या काही काळामध्ये हे नाटक लोकप्रिय होईल आणि त्याचे अधिक प्रयोग होतील, असेही सांगण्यात येत आहे.

पर्ण पेठेने मराठी सिनेमातून रसिकांची मने जिंकली आहेत. रमा माधव ,वायझेड ,फोटोकॉपी, विहीर अशा अनेक सिनेमात विविध प्रकारच्या भूमिका पर्ण पेठे हिने साकारल्या आहेत. अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत नेहमीच ती सज्ज असते. एखाद्या स्टाईलमध्ये आपण किती कम्फर्टेबल आहोत, त्याला पर्ण अधिक प्राधान्य देत असते.

पर्ण पेठे सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते. पर्ण ही लेखक दिग्दर्शक अतुल पेठे यांची कन्या आहे. अभिनयाचे बाळकडू पर्णला हे घरातूनच लाभले आहेत. पर्ण आणि लेखक दिग्दर्शक अतुल पेठे सध्या अडलयं का या नाटकात एकत्र काम करताना दिसत आहेत. या नाटकातील या दोघांच्या अभिनयाचे कौतुक देखील होत आहे.

निपूण धर्माधिकारी यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षकांकडून या बाप लेकीच्या जोडीच्या नाटकाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. पर्ण पेठे ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असताना दिसत असते. यावर ती आपले वेगवेगळे फोटो देखील अपलोड करत असते.

तिच्या या फोटोला चाहते देखील खूप लाईक आणि शेअर देखील करत असतात. आता पर्ण पेठे आणि अलोक राजवाडे हे रियल लाईफ मध्ये पती-पत्नी असले तरी त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. गिरीश कुलकर्णी यांच्या विहीर या चित्रपटात या दोघांनी चुलत बहीण भावाची भूमिका साकारली होती, तर रमा माधव या चित्रपटातही त्यांनी आजरामवर अशी भूमिका केली होती.

तर आपल्याला पर्ण पेठे यांची जोडी आवडते का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral