दिसायला खूपच ‘सुंदर’ आहे अमरीश पुरी यांची मुलगी, फोटो पाहून तुम्ही तिच्या प्रेमात वेडे व्हाल

दिसायला खूपच ‘सुंदर’ आहे अमरीश पुरी यांची मुलगी, फोटो पाहून तुम्ही तिच्या प्रेमात वेडे व्हाल

बॉलिवूड मधले ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांचा वाढदिवस 22 जून रोजी असतो. अमरीश पुरी हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध आणि खतरनाक खलनायक होते.

‘मिस्टर इंडिया’, ‘नगीना’, ‘नायक’, ‘दामिनी’ आणि ‘कोयला’ यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांच्या काही पात्रांबद्दल आजही लोक खूप चर्चा करतात. 80-90 च्या दशकात अमरीश हे प्रत्येक चित्रपटांचा एक महत्त्वाचा भाग असायचे.

अमरीश पुरी यांनी केवळ हिंदीमध्येच नव्हे तर Indiana Jones And Tge Temple Of Doom या हॉलिवूड चित्रपटामध्ये देखील काम केले. या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बऱ्याच हेडलाईन वर आपली जागा निर्माण केली होती. अमरीश पुरी बद्दल एवढी चर्चा आता पुरे आहे. तर आज आम्ही तुम्हाला अमरीश पुरी याबद्दल नव्हे तर त्यांची मुलगी नम्रता हिच्या बद्दल सांगणार आहोत.

400 चित्रपटांमध्ये काम करणारे लोकप्रिय अमरीश पुरी यांची मुलगी कुठे आहे? ती नेमकं काय करते ? ती चित्रपटात का आली नाही ? स्टार किड्स तर चित्रपटांमध्ये लाँचिंगसाठी किती उत्साही असतात. मग नम्रताने चित्रपटांमध्ये येण्याचा का प्रयत्न केला नाही? अमरीश पुरी यांना एक मुलगी आहे. नम्रता या बॉलिवूडच्या चमकदार दुनियेपासून दूर राहते.

नम्रता बाकीच्या स्टार किड्सपेक्षा अगदी वेगळी आहे. साधे जीवन जगणारी नम्रता आज सॉफ्टवेअर इंजीनियर आहे. नम्रताला बॉलिवूडमध्ये पहिल्यापासूनच रस नव्हता. नम्रताचे जसे नाव तसे स्वरूप देखील आहे. ति स्वत: ला टीव्ही आणि चित्रपटांपासून दूर ठेवत असली तरीही सोशल मीडियावर ती खूप अ‍ॅक्टिव्ह राहते. काही दिवसांपूर्वी नम्रताने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, जे बर्यापैकी व्हायरलही झाले होते.

नम्रतानेही बॉलिवूडमध्ये काम केले पाहिजे अशी त्यांच्या चाहत्यांनी बऱ्याचदा विनंती केली आहे. पण अद्याप नम्रताने त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सॉफ्टवेअर इंजिनिअर व्यतिरिक्त नम्रता एक कॉस्च्यूम डिझाइनर देखील आहे. नम्रता विवाहित असून तिला एक मुलगी आहे. अमरीश पुरी यांना राजीव पुरी नावाचा एक मुलगा देखील आहे.

राजीवही आपल्या व्यवसायात व्यस्त आहे. अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन अमरीश पुरी हे मुंबईत आले, परंतु कित्येक स्क्रीन चाचणी अयशस्वी झाल्यानंतर त्यांना एलआयसीमध्ये नोकरी मिळाली. यातूनच त्यांनी पृथ्वी थिएटरमध्ये अभिनय सुरू केला. थिएटर करत असताना ते हळूहळू जाहिरातींमध्ये दिसू लागले.

वयाच्या 39 व्या वर्षी अमरीश पुरीयांना बॉलिवूडमध्ये पहिली भूमिका मिळाली. ‘रेश्मा और शेरा’ असे या चित्रपटाचे नाव होते. या सिनेमात त्यांनी वहीदा रहमान आणि सुनील दत्तसोबत अभिनय केला होता. 12 जानेवारी 2005 रोजी अनेक चित्रपटात संस्मरणीय भूमिका साकारल्यानंतर ब्रेन हेमरेजमुळे अमरीश पुरी यांचा मृ-त्यू झाला.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral