तब्बल नऊ वर्षानंतर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

तब्बल नऊ वर्षानंतर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या अनेक दिवसापासून अनेक मालिका या छोट्या पडद्यावर सुरू असल्याचे आपण पाहत आलो आहोत. अनेक मालिकांना प्रेक्षक वर्ग देखील भेटत असतो. सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर आई कुठे काय करते ही ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

या मालिकेला अफाट यश देखील मिळाले आहे. त्याचप्रमाणे सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवार यासारख्या मालिकांनी देखील प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत. आता या मालिकांमध्ये अनेक कलाकार हे काम करत असतात. मात्र, काही कलाकार हे सुरुवातीला मालिका करतात आणि त्यानंतर गायब होऊन जातात.

त्यानंतर त्यांना मालिकात कामच मिळत नाही, असे अनेक उदाहरणं आपण पाहिलेले आहेत. काही वर्षांपूर्वी स्पृहा जोशी ही देखील अनेक मालिकांमध्ये आपल्याला दिसली होती. एका लग्नाची तिसरी गोष्ट, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेमध्ये तिने दमदार अशी भूमिका साकारली होती. मात्र, कालांतराने तिला मालिका या मिळाल्या नव्हत्या.

मात्र, आता ती पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यास तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत तिनेच खुलासा करून सांगितले आहे की, मी लवकरच आता मालिकेमध्ये पुनरागमन करणार आहे, तर स्पृहा जोशी हिला पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याचे देखील दिसत आहेत, तर आता देखील एक अभिनेता तब्बल नऊ वर्षानंतर मालिका विश्वामध्ये पुनरागमन करणार आहे. होय आपण ऐकले ते खरं आहे.

या कलाकाराने का रे दुरावा या मालिकेमध्ये काम केले होते. आता छोट्या पडद्यावर ‘ठरलं तर मग’ ही मालिका लवकर सुरू होणार आहे. पाच डिसेंबर पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला जुई गडकरी ही अभिनेत्री दिसणार आहे. जुई गडकरी हिने देखील अनेक वर्षानंतर या मालिकेत पुनरागमन केले आहे.

जुई गडकरी ही मध्यंतरी आजारी होती. जुई गडकरी ही पुढचं पाऊल या मालिकेमध्ये आपल्याला कल्याणीच्या भूमिकेत अतिशय जबरदस्त काम करताना दिसली होती. मात्र, त्यानंतर ती आजारी पडली आणि मालिका विश्वापासून दूर गेली. आता ती या ‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये दिसणार आहे, तर या मालिकेमध्ये आपल्याला अमित भानुशाली हा अभिनेता दिसणार आहे.

अमित हा तब्बल नऊ वर्षानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची भूमिका देखील अतिशय चांगल्या पद्धतीची असणार असल्याचे सांगण्यात येते, तर आपल्याला अमित हा अभिनेता ‘ठरलं तर मग’ या मालिकेत पाहायला आवडेल का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral