45 वर्षांपूर्वी अमिताभ यांना 1 चुकीसाठी भोगावी लागली होती मोठी शिक्षा, वैतागून उचलले होते असे पाऊल ….

45 वर्षांपूर्वी अमिताभ यांना 1 चुकीसाठी भोगावी लागली होती मोठी शिक्षा, वैतागून उचलले होते असे पाऊल ….

अमिताभ बच्चनने आत्ता नुकतीच आपल्या डोळ्याची सर्जरी केली आहे.अमिताभची हॉस्पिटलमध्ये असल्याची बातमी ऐकताच त्याचे करोडो फॅन चिंताग्रस्त झाले होते.बॉलीवूडमध्ये त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक वेडे होतात.पण एक काळ असा देखील होता मीडियाने त्यांच्यावर 1-2 वर्ष नाहीतर तब्बल 15 वर्ष बंदी घातली होती.

तो काळ होता जेव्हा देशात इमरजन्सी लावली होती.अमिताभ ने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला होता की मीडिया ने त्यांच्यावर पूर्णपणे बंदी घातली होती.या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नेमकं काय कारण होत मीडियाच हे असं करण्यामागे. तस पाहिलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी खूप चांगले मित्र होते.

जेव्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा बऱ्याच चित्रपटावर आणि चित्रपट मॅगझीन वर बंदी आलेली होती याचा खूप तोटा अमिताभला सहन करावा लागला होता.जेव्हा चित्रपट मॅगझीन वर देखील सेंसर लागू केलं तेव्हा याचा सर्व राग अमिताभ वर काढला गेला.आणि यामुळेच मीडिया ने त्यांच्यावर बंदी देखील घातली.

आपत्कालीन परिस्थितीच्या वेळेस चित्रपटातील बातम्या ऐकण्यासाठी ना तेव्हा वर्तमानपत्रे होते ना कोणती वहिनी होती आणि सोशल मीडियाचा तर विषयच नव्हता.अशावेळेस चित्रपट मॅगझीन हा एकमेव उपाय होता बॉलीवूडमधील बातम्यांची माहिती करून घेण्यासाठी आणि मॅगझीन एडिटर ला वाटले की अमिताभ गांधी परिवाराच्या खूप जवळ असल्याने हे सगळे त्यांच्या सांगण्यावरून झाले असावे.

जेव्हा इंदिरा गांधी 1977 मध्ये निवडणूक हरली तेव्हा सिनेब्लिट्ज आणि स्टारडस्ट या सारख्या मोठ्या मोठया मॅगझीन एडिटर ने एक मिटींग भरवली आणि त्यांनी ठरवले की अमिताभचा फोटो आणि बातम्या कोणाच्याच मॅगझीनला दिसता कामा नये.अशावेळी अमिताभला माहिती देखील नव्हते मीडियाने त्यांच्यावर बंदी घातलेली आहे.

आणि नंतर मग जेव्हा अमिताभ कळाले की देशातील मीडियाने त्यांच्यावर कोणत्याही कारणाशिवाय बंदी घातली आहे तेव्हा चिडलेल्या अमिताभने बदला घेण्याचे ठरवले.त्यावेळी अमिताभ ने कोणत्याच मॅगझीन ला ना मुलाखत ना फ़ोटो देण्याच्या निर्णय घेतला.

अमिताभला बंदी घातली म्हणजे नेमकं मीडिया एडिटर काय करत असत तर जेव्हा एखादा फोटो मॅगझीन कडे येत असत आणि त्यात अमिताभ असेल तर ते फोटो क्रॉप करून अमिताभला कट करत असत.त्यामुळे नंतर अमिताभ स्वतःहूनच फोटो मध्ये साईडला उभे थांबत असत जे करून तो फोटो छापण्या आधीच क्रॉप केला जाईल.

आशा पद्धतीने जवळ जवळ अमिताभ वर 15 वर्ष बंदी घातली गेलेली होती. काही काळानंतर अमिताभ ने पत्रकार परिषद बोलावली जेव्हा ते बोफोर्स घोटाळ्यामुळे चर्चेत आले होते.या वेळी चिंताजनक अमिताभने आजूबा च्या सेट वर त्यांच्या पीआर द्वारे पत्रकारांना बोलावून घेतले.

या पत्रकार परिषेदेत बिग बी सांगितले की राजकारण तर मी खूप आधीच सोडून दिले आहे.आणि हे देखील सांगतो की आपत्कालीन परिस्थिती मध्ये मॅगझीन वर लावलेल्या सेंसर वर माझा हात नव्हता.या नंतर मीडियाने लावलेला अमिताभ वरील बंदी शेवटी संपली व ते परत मॅगझीन द्वारे खूप झळकायला लागले.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral