या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांच्या उपचारासाठी मदतीचे केले आवाहन..

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक छोटे मोठे असे कलाकार आहेत की, जे आपल्या अभिनयाने सर्वांची मन जिंकतात. यामध्ये अनेक असे कलाकार आहेत की, जे अतिशय ग्रामीण भागातून आलेले आहेत. त्यामध्ये सध्या आघाडीचा सुपरस्टार असलेला मकरंद अनासपुरे याचाही समावेश आहे.
मकरंद अनासपुरे हा बीड सारख्या शहरातून मुंबईत जाऊन आपल करिअर घडवतो. त्याचप्रमाणे कमलाकर सातपुते हा देखील मराठवाड्याच्या मातीचा कलाकार आहे. जालना जिल्ह्यातील कैलास वाघमारे याने देखील अल्पावधीतच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपले वेगळे असे स्थान निर्माण केले आहे.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘तानाजी अनसंग वॉरियर’ या चित्रपटामध्ये त्याने अतिशय छोटी भूमिका केली. त्याची चुचा ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती, तर इतर कलाकारही आज आपल्या परीने मेहनत घेऊन मराठी चित्रपट सृष्टी मध्ये नाव कमवत आहेत. मात्र, या कलाकारांना हवे तसे मानधन मिळत नाही.
त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. साहजिकच यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही आणि कुटुंबीयांची मदत देखील करता येत नाही. अशातच एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्यांना खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. आता देखील मराठी चित्रपट सृष्टी मध्ये काम करणाऱ्या एका कलाकाराबाबत असाच गंभीर प्रसंग समोर आला आहे.
या कलाकाराने वडिलांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. त्याला अनेक कलाकार देखील प्रतिसाद देताना दिसत आहेत. बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याच्या वडिलांना दुर्मिळ आजारांने ग्रासले आहे. अमोल धोंगडे असे या कलाकाराचे नाव आहे.
बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेला व त्यातील कलाकारांना भरपूर लोकप्रियता मिळाली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शेकटा या गावातील अमोल धोंगडे या कलाकारालाही तितकीच प्रसिद्ध मिळाली. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मालिका विश्वात स्वतःच स्थान निर्माण करणारा अमोल सध्या एका कठीण प्रसंगाला सामोरे जातोय.
अमोलचे वडील एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहेत. त्याच्यावर आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने वडिलांच्या उपचारासाठी कलाविश्वातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या वडिलांना मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
बाळू मामाच्या नावानं चांगभलं, श्री स्वामी समर्थ या कलर्स मराठी वरील तर स्वराज्य सौदामिनी ताराराणी अशा मराठी मालिकांमध्ये अमोलने अभिनय केलाय. तर अमोल ला या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी काही सांगायचे असल्यास कमेंट मध्ये सांगू शकता.