…म्हणून अमोल कोल्हे यांनी केले प्रवीण तरडे यांच्या पत्नीचे कौतुक, केलंच आहे ‘खास’ काम

…म्हणून अमोल कोल्हे यांनी केले प्रवीण तरडे यांच्या पत्नीचे कौतुक, केलंच आहे ‘खास’ काम

डॉक्टर अमोल कोल्हे यांना कोण ओळखत नाही. अमोल कोल्हे यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मालिका हिट करून दाखवलेले आहे. स्वराज्य रक्षक संभाजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरील मालिका या त्यांनी प्रचंड लोकप्रिय केलेल्या आहेत.

शिवाजी महाराजांवरील कार्य ते करताना नेहमीच दिसत असतात. संभाजी महाराजांवरील ते अनेक कार्य ते करत असतात. त्याचप्रमाणे आता अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार झालेले आहेत. संसदेमध्ये देखील शिवरायांच्या गड किल्ल्याबाबत ते अनेकदा प्रश्न उपस्थित करताना दिसत असतात.

अमोल कोल्हे यांनी ज्या वेळेस मनोरंजन क्षेत्रामध्ये प्रवेश केला, त्यावेळेस त्यांची अनेकांनी खिल्ली उडवली होती. मात्र आता ते एक जबरदस्त अभिनेते म्हणून उदयास आलेली आहेत. तर दुसरीकडे अमोल कोल्हे यांची आता एक पोस्ट आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

या पोस्ट मध्ये अमोल कोल्हे प्रवीण तरडे यांच्या पत्नीचे कौतुक करताना दिसत आहेत. प्रवीण तरडे यांनीदेखील मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक मालिका चित्रपटातही काम केले आहे. देऊळ बंद या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेला मुळशी पॅटर्न हा चित्रपटही प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

तसेच आगामी काही चित्रपटात दिसणार आहेत. सरसेनापती हंबीरराव या चित्रपटातही ते दिसणार आहेत. आता अमोल कोल्हे यांनी नुकतीच प्रवीण तरडे यांच्या पत्नीचे कौतुक केले आहे. काही वर्षांपूर्वी एस एस राजमौली यांचा बाहुबली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला. या चित्रपटाने प्रचंड धुमाकूळ घातला होता हा चित्रपट दक्षिणेचा हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित झाला.

त्यानंतर आता हा चित्रपट इतर भाषांमध्ये देखील प्रदर्शित करण्यात येत आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांचे नाव चर्चेत आले आहे. बाहुबलीच्या मराठी करनासाठी अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतलेला आहे यासाठीच अमोल कोल्हे यांनी प्रवीण तरडे यांच्या पत्नीचे विशेष आभार मानले आहेत.

बाहुबली आणि बाहुबली टू हे चित्रपट काही दिवसांपूर्वी मराठीत चित्रित करण्यात आले होते. हे दोन्ही चित्रपट शेमारू मराठी बाणा या वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आली. या बाबतच अमोल कोल्हे यांनी नुकतीच ही माहिती दिलेली आहे. हा चित्रपट मराठी करताना खूप मजा आली. विशेषत या चित्रपटासाठी प्रवीण तरडे यांच्या पत्नीचे कौतुक करू इच्छितो.

त्यांनी या चित्रपटाचे पूर्ण मराठीकरण केले आहे. चित्रपटातील मूळ कथेला कुठेही हात न लावता जशाचा तसा हा चित्रपट करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठमोळ्या बाहुबलीची कलात्मक जबाबदारी सांभाळली होती.

तसेच या चित्रपटासाठी डॉक्टर अमोल कोल्हे गश्मीर महाजनी, मेघना एरंडे, सोनाली कुलकर्णी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे या कलाकारांनी आपला आवाज दिला होता. याची जबाबदारी प्रवीण तरडे यांच्या पत्नीने देखील स्वीकारली होती. त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तिचे कौतुक केले आहे.

Team Hou De Viral