अपूर्वा नेमळेकर अमृता धोंडगे वर प्रचंड भडकली

अपूर्वा नेमळेकर अमृता धोंडगे वर प्रचंड भडकली

बिग बॉसच्या घरामध्ये आता वादाचे प्रसंग हे मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये अपूर्वा नेमळेकर हिने पहिल्यांदा वादाला सुरुवात केली. आता देखील अपूर्वा नेमळेकर आणि अमृता धोंडगे यांच्यामध्ये प्रचंड वाद झाल्याचे माहिती समोर आले आहे.

याबद्दलच आम्ही आपल्याला या लेखामध्ये माहिती देणार आहोत. 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीपासून मराठी बिग बॉसच्या चौथ्या सत्राला सुरुवात झाली आहे. बिग बॉसचे चौथे सत्र हे आता वादविवादाने चांगलेच रंगतांना दिसत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये अनेक कलाकार हे सहभागी झालेले आहेत.

बिग बॉसच्या घरामध्ये अनेक कलाकार हे सहभागी झाले आहेत. यामध्ये अपूर्वा नेमळेकर, प्रसाद जवादे, अमृता धोंडगे, मेघा घाडगे, किरण माने, विकास सावंत, तेजश्री लोणारे, डॉक्टर रोहित शिंदे, रुचिरा जाधव, योगेश जाधव, समृद्धी जाधव यांच्यासह इतर कलाकार देखील सहभागी झाले आहेत.

पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यामध्ये प्रचंड वाद झाल्याचे आपण पाहिले. त्यानंतर चावडीवर महेश मांजरेकर यांनी अपूर्व नेमळेकर हिला चांगलेच सुनावले होते. त्यानंतरही अपूर्वा नेमळेकर ही काही थांबण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वीच अपूर्वा नेमळेकर हिने किरण माने यांच्यासोबत देखील हुज्जत घालून त्यांना एकेरी भाषेत उल्लेख केला होता.

त्यानंतरही अपूर्वा नेमळेकर हिचे वाद घालण्याचे काही थांबत नाही.
मध्यंतरी किरण माने आणि विकास सावंत यांच्यामध्ये देखील वाद झाल्याचे पाहायला मिळाले. विकास सावंत हा किरण माने यांच्यावर विकास सावंत नाराज झाला असे देखील या घरामध्ये आपल्याला दिसले. किरण माने, विकास सावंत त्याला म्हणताना दिसले की, तू आता तुझे तू पाहून घे’ मी तुला काही मदत करू शकत नाही.

त्यानंतर विकास सावंत हा खूपच गहिवरला आणि किरण माने यांना तुम्ही असे का करता, असे म्हणू लागला. तर असे बिग बॉसच्या घरामध्ये अनेक प्रसंग घडताना दिसत आहेत. आता देखील बिग बॉसच्या घरामध्ये अपूर्वा नेमळेकरचा पुन्हा एकदा वाद झाल्याचे समोर आले आहे. अपूर्वा नेमळेकर आणि अमृता धोंडगे यांच्यामध्ये प्रचंड वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

अमृता धोंडगेच्या हातामध्ये नॉमिनेशन करण्याचे होते. त्यामुळे अपूर्वा नेमळेकर हिला अमृता धोंडगे म्हणताना दिसत आहे की, तू या आठवड्यामध्ये अजिबात चांगला खेळ केला नाही. त्यामुळे मी तुला नॉमिनेशन नक्कीच करेल. त्यावर अपूर्वा नेमळेकर ही संतापली आणि तिने देखील तिला प्रत्युत्तर देत सांगितले की, या आठवड्यात तुझ्या हातात आहे म्हणून मी काही बोलणार नाही.

मात्र, तुला जे काय वाटतं ते सर्वांना वाटत नाही, असे अपूर्वा म्हणत आहे. त्यामुळे या दोघींमध्ये आता प्रचंड वाद झाल्याचे पहायला मिळणार आहे. पुढे आता अपूर्वा नेमळेकर काय करते हे पाहावे लागेल.

Team Hou De Viral