सनी देओल वर वेड्यागत ‘प्रेम’ करायची अमृता, परंतु सनीबद्दल ती गोष्ट समजता दोघांत आला ‘दुरावा’

सनी देओल वर वेड्यागत ‘प्रेम’ करायची अमृता, परंतु सनीबद्दल ती गोष्ट समजता दोघांत आला ‘दुरावा’

सैफ अली खानची एक रॉयल फॅमिली आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. सैफने प्रथम अमृता सिंगशी लग्न केले, जरी आता ते दोघे वेगळे झाले आहेत, पण एक काळ असा होता की सैफ पूर्णपणे अमृतासाठी वेडा झाला होता.

सिमी ग्रेवाल यांच्या चॅट शोमध्ये सैफ आणि अमृताने त्यांच्या पहिल्या डेट विषयी बर्‍याच गोष्टी सांगितल्या होत्या.सैफबद्दल बोलताना अमृताने अनेक खुलासे केले होते. सनी देओलमुळे ती सैफकडे दुर्लक्ष करायची असेही तिने सांगितले. वास्तविक त्यावेळी सनी देओलसोबत तिचे अफेअर चालू होते. मात्र नंतर ती सैफ प्रेमात पडली.

सनी देओल आणि अमृता सिंग यांनी 1983 मध्ये रिलीज झालेल्या सुपरहिट ‘बेताब’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘बेताब’ चित्रपटाच्या यशानंतर अमृता सिंग आणि सनी देओल यांच्यातील अफेअरच्या बातम्या चर्चेत राहिल्या. आश्चर्य म्हणजे त्या वेळी सनी देओलचे लग्न झाले होते. पण त्याने ही गोष्ट लोकांपासून लपवून ठेवली आणि अमृतालाही याची कल्पना नव्हती.

पहिले लग्न लपवले

सनीचे प्रथम लग्न बिजनेस कराराअंतर्गत झाले होते. वास्तविक, धर्मेंद्रला असे नको वाटत होते की सनी देओल चा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सनी देओलच्या लग्नाचा पर्दाफाश होऊ याचा सनीच्या रोमँटिक प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तर सनीची पत्नी पूजा चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत लंडनमध्येच राहिली होती.

पहिल्या लग्नाची माहिती होताच दोघांमध्ये दुरावा

त्यावेळी सनी गुप्तपणे लंडनला पूजाला भेटायला जात असे. नंतर सनी देओलच्या लग्नाची बातमी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली तेव्हा सनीने याचा इन्कार केला. सनी देओल विवाहित असल्याची सत्यता अमृता सिंगला समजताच अमृता सिंगने त्याच्या सोबत संबंध तोडले.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral