‘बिगबॉस’ च्या घरात मोठा कांड ! ‘किरण माने’ यांच्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडली अमृता देशमुख…

‘बिगबॉस’ च्या घरात मोठा कांड ! ‘किरण माने’ यांच्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडली अमृता देशमुख…

मराठी बिग बॉसच्या चौथ्या सत्रामध्ये आता नाराजी नाट्य, रडणे, भांडणे हे सगळे काही सुरू झाले आहे, असे गेल्या काही भागांमध्ये दिसत आहे. आता देखील बिग बॉसच्या घरामध्ये एक कलाकार जोरदार भांडण करुन रडण्याचे प्रकरण समोर आले आहे.

2 ऑक्टोबर पासून हा शो कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू झाला आहे. बिग बॉस या शोला ठराविक असा प्रेक्षक वर्ग आहे, जो मर्यादित वेळेत हा शो पाहतच असतो. मात्र, अनेक जण हा शो पाहताना दिसत नाही. काही जण या शोला डोक्यावर घेऊन टीआरपी वाढवत आहेत, हे देखील दिसत आहे.

त्यामुळे या शोची लोकप्रियता देखील गेल्या अनेक दिवसापासून वाढताना दिसत आहेत. बिग बॉस शोचे सूत्रसंचालन नेहमीप्रमाणे अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करताना दिसत आहेत. आता या बिग बॉसच्या शोमध्ये वादग्रस्त अभिनेते किरण माने हे देखील सहभागी झाले आहेत. किरण माने यांचा मुलगी झाली हो या मालिकेदरम्यान प्रचंड वाद झाल्याचे समोर आले होते.

त्यानंतर त्यांना या मालिकेतून बाहेर काढण्यात आले. आता बिग बॉसच्या घरात देखील ते अतिशय चांगल्या प्रकारे खेळताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे इतरांना धीर देखील देताना दिसत आहेत. मात्र मुलगी झाली हो मालिकेच्या सेटवर नेमके काय घडले होते, याचे खरे कारण अजूनही कळू शकले नाही. आता बिग बॉसच्या शोमध्ये अमृता देशमुख, किरण माने, विकास पाटील हे एका ग्रुप मध्ये आहेत.

ते सगळेजण चांगले खेळताना दिसत आहेत. मात्र, मध्यंतरी कोणासोबत तरी वाद होताना किरण माने हे सगळ्यांना धीर देताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी विकास पाटील याला देखील किरण माने यांनी धीर दिला होता. मात्र काही जणांनी किरण माने यांनी त्याचे कान भरले, असे म्हटले होते. विकास पाटील याला दुसऱ्या ग्रुप मधील सदस्य हे प्रचंड त्रास देत आहेत.

त्यामुळे किरण माने यांनी त्याला ‘तू देखील आक्रमकपणे खेळ आणि सगळ्यांना उत्तर दे’, असे म्हटले होते. तर अलीकडे झालेल्या भागात प्रसाद जवादे आणि निखिल राज शिर्के यांच्यामध्ये प्रचंड वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे या दोघांपैकी शोच्या बाहेर कोण जातो याची उत्सुकता देखील अनेकांना लागली आहे.

आता देखील बिग बॉस चा एक प्रोमो समोर आला असून या प्रोमो मध्ये अमृता देशमुख ही किरण माने यांच्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडताना दिसत आहे, तर तिला विकास पाटील हा देखील धीर देताना दिसत आहे. किरण माने अमृता देशमुख हिला समजवताना सांगत आहेत की, आपला प्रभाव कमी करण्यासाठी हे लोक आपल्याला असे वागवत असतात.

त्यामुळे आपण अतिशय मनमोकळेपणाने खेळले पाहिजे आणि अतिशय पॉझिटिव्ह राहून खेळले पाहिजे. त्यामुळे तू असा विचार कर आणि खेळ, तुला यश मिळेल, असे ते म्हणताना दिसत आहेत. माझ्यासोबत काय झाले होते हे तू पाहिलेच आहे, असे ते म्हणताना दिसत आहेत. त्यानंतर अमृता देशमुख ही थोडी शांत झाल्याचे दिसत आहे.

तर आता या शोमध्ये पुढील भागात काय होणार हे पाहणे फार मजेशीर ठरणार आहे.

Team Hou De Viral