बिगबॉस च्या घरात मोठा मॅटर, अमृता देशमुख ढसाढसा रडली…

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या मराठी बिग बॉस मध्ये आता वाद विवादाचे प्रसंग हे मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. या वाद विवादावर तोडगा काढण्यासाठी चावडीवर सूत्रसंचालक महेश मांजरेकर हे देखील सर्वांची समजूत काढत असतात.
मात्र, काही स्पर्धक हे समजण्याच्या पलीकडे असतात. घरामध्ये सहभागी झालेली अभिनेत्री व स्पर्धक अमृता देशमुख हिच्या या बाबतीत देखील असाच एक प्रकार नुकताच घडला आहे. याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. 2 ऑक्टोबर पासून बिग बॉस हा शो मोठ्या थाटात सुरू झाला आहे. बिग बॉसच्या घरामध्ये यावेळेस मागच्या तीन सत्रापेक्षा थोडी कमी प्रसिद्ध असलेले कलाकार आहेत.
बिग बॉसच्या घरामध्ये अमृता देशमुख, प्रसाद जवादे, तेजस्विनी लोणारे, यशस्वी मसुरेकर, योगेश जाधव, डॉक्टर रोहित शिंदे, रुचिरा जाधव, किरण माने, विकास सावंत हे सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे या शो मधून निखिल राज शिर्के हा पहिल्यांदा बाहेर पडला आहे. त्यामुळे आता एकेक कलाकार या शोच्या बाहेर पडणार आणि अंतिम जो कोणी या शोमध्ये राहील.
तो या स्पर्धेचा विजेता होईल. बिग बॉस सुरू झाल्यानंतर सगळ्यात आधी प्रसाद जवादे आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यामध्ये प्रचंड वाद झाला होता. अपूर्वा नेमळेकर हिने प्रसाद याला चांगलेच सुनावले होते. मात्र, त्यानंतर हा वाद शमला होता. त्यानंतरही अपूर्वा नेमळेकर हिने किरण माने यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे देखील अनेक जण तिच्यावर संतापले होते.
मध्यंतरी झालेल्या एका टास्क दरम्यान विकास सावंत हा खूप रडला आणि किरण माने आता तुम्ही माझी साथ देत नाही आहात, असे म्हणत होता. त्यावर किरण माने म्हणाले की तू आता पाहून घे मी आता तुला यापुढे साथ देणार नाही. बिग बॉसच्या घरामध्ये आता एक वादाचा प्रसंग घडल्याचे पाहायला मिळाले आहे.
एका टास्क दरम्यान अमृता देशमुख तेजस्विनी लोणारे प्रसाद जवादे हे सर्व खेळत असतात. हे खेळता खेळता अचानक अमृता देशमुख ही रडायला लागते. त्यानंतर सगळेजण तिच्याजवळ येतात. त्यानंतर अमृता देशमुख ही म्हणते की, मला चांगला परफॉर्मस करायचा होता. मात्र, मला करता आला नाही. तेजस्विनी हिने मला चान्स दिला नाही, असा थेट तिने आरोप लावला आणि ढसा रडायला लागली.
त्यानंतर प्रसाद जवादे हा तिच्या बाजूने उभा राहिला आणि तिला खरंच चांगलं खेळता येत होते. मात्र, तिला चान्स दिला नाही, असे म्हणतो. त्यावर अमृता आणि तेजस्विनी यांच्यामध्ये वाद झाल्याचे देखील पाहायला मिळाले, तर यामध्ये कोण खरं आहे आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.